फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore match toss update : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये लढत सुरू होणार आहे. याआधी नाणेफेकचा निकाल समोर आला आहे, या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रजत पाटीदारच्या संघाकडे गोलंदाजीचे आव्हान पहिल्या डावात असणार आहे. आज विराट कोहली आणि एमएस धोनी हे आमने-सामने असणार आहेत. मागील काही सामन्यांपासून त्याचबरोबर चॅम्पियन स्ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने त्याच्या कामगिरीने चाहत्यांची मन जिंकले आहेत. मागील सामन्यांमध्ये देखील त्याने अर्धशतकीय खेळी खेळली होती त्यामुळे आजच्या सामना त्याच्या कामगिरीवर चहा त्यांची नजर असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा सलामी वीर फलंदाज रचिन रवींद्र याने मागील सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळ खेळली होती आणि खेळ संपवला होता त्यामुळे त्याच्यावर देखील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा फिरकी गोलंदाज नूर अहमद याने दमदार गोलंदाजी करून स्वतःला सिद्ध केले आज त्याच्यावर क्रिकेट फॅन्सची नजर असणार आहे.
🚨 Toss 🚨@ChennaiIPL elected to field against @RCBTweets
Updates ▶️ https://t.co/I7maHMwxDS #TATAIPL | #CSKvRCB pic.twitter.com/prn0Ckrfo7
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2025
चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. पाथिराना संघात परतला आहे. दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याला नॅथन एलिसच्या जागी संधी मिळाली आहे. बेंगळुरूच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल झाला आहे. भुवनेश्वर कुमार संघात परतला आहे. रसिक सलामच्या जागी त्याला संधी मिळाली आहे.
विराट कोहली, फिलिप साल्ट, देवदत्त पडिकल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल.
सुयश शर्मा, रसिक दार सलाम, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, मनोज भानागे
विराट कोहली, फिलिप साल्ट, देवदत्त पडिकल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल.
शिवम दुबे, कमलेश नागरकोटी, विजय शंकर, जेमी ओव्हरटन, शेख रशीद