फोटो सौजन्य - IndianPremierLeague
चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स पहिल्या डावाचा अहवाल : आज अरुण जेटली मैदानावर चेन्नई सुपर किंग्स सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध सुरू आहे. या सामन्याचा पहिला डाव पार पडला आहे या पहिल्या डावात चेन्नईच्या संघाने पहिले फलंदाजी करत 188 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. यामध्ये आजच्या सामन्यात युवा खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्ससाठी युद्धवीर सिंग याने संघाला तीन विकेट्स मिळवून दिले. आजच्या सामन्याच्या पहिल्या डावाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
चेन्नई सुपर किंग्स चा फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर युवा खेळाडू आयुष म्हात्रे यांनी आज कमालीची खेळी खेळली. आयुष म्हात्रे याने 20 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या यामध्ये त्याने एक षटकार आणि आठ चौकार मारले. डेव्हॉन कॉन्वे हा आजच्या सामन्यात फेल ठरला त्याने आठ चेंडू खेळले आणि फक्त दहा धावा करून विकेट गमावली. मागील सामन्यात पदार्पण करणारा उर्विल पटेल आज शून्य धावा करून बाद झाला. रविचंद्रन अश्विनला आजचे सामन्यात संधी मिळाली पण तो त्याच्या बॅटने काही विशेष कामगिरी करू शकला नाही.
Innings Break!
Cameos from Ayush Mhatre, Dewald Brevis and Shivam Dube help #CSK post a competitive total of 187/8 🙌#RR‘s chase 🔜
Updates ▶ https://t.co/hKuQlLxjIZ #TATAIPL | #CSKvRR pic.twitter.com/9K0WRewn2y
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2025
डेव्हॉल्ड ब्रेविस याने आणखी एकदा चाहत्यांना प्रभावित केले त्याने आजच्या सामन्यात 25 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या यामध्ये त्याने तीन षटकार आणि दोन चौकार मारले. आजच्या सामन्या शिवम दुबे च्या बटने महत्वाच्या 39 धावा आल्या. तर महेंद्रसिंग धोनी यांनी 17 जानेवारी 16 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर आकाश मधवाल याने संघाला तीन विकेट्स मिळवून दिले. यामध्ये त्याने एम एस धोनी शिवम दुबे आणि डेव्हॉल्ड ब्रेविस या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. युद्धवीर सिंग याने देखील आज कमालीची गोलंदाजी केली आणि संघाला तीन विकेट्स मिळवून दिले. आजच्या सामन्यात yudhvir सिंग याने डेव्हॉन कॉन्वे, उर्बिल पटेल आणि रवींद्र जडेजा यांना पवेलियनचा रस्ता दाखवला. तुषार देशपांडे याने आणि वानिंदु हंसरंगा या दोघांनी संघाला प्रत्येकी एक विकेट मिळवून दिला.