21-year-old batsman shines in Duleep Trophy! Danish Malewar hits double century against NorthEast
Danish Malewar hits double century in Duleep Trophy: दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेची २८ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये मध्य विभाग आणि नॉर्थ ईस्ट विभाग यांच्यात क्वार्टर फायनल सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दानिश मालेवारने मध्य विभागाकडून खेळताना नॉर्थ ईस्ट विभागाविरुद्ध धामकेदार कामगिरी करत द्विशतक झळकावले आहे.
रणजी करंडकात विदर्भाकडून शानदार प्रदर्शन करणाऱ्या दानिश मालेवारने दुलीप ट्रॉफीमध्ये देखील तोच फोरम कायम राखत दुलीप ट्रॉफी २०२५ च्या क्वार्टर फायनल सामन्यात द्विशतक झळकावले आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस दानिशने २१९ चेंडूंचा सामना करत १९८ धावा फटकावल्या आहेत. त्याच वेळी, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच दानिशने त्याचे द्विशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ३५ चौकार आणि १ षटकार ठोकला.
हेही वाचा : BCCI मध्ये मोठा संघटनात्मक बदल! नव्या कार्यकारी अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची नियुक्ती
दानिशच्या आधी संघाचा कर्णधार रजत पाटीदारने देखील शतक ठोकले आहे. त्याने फक्त ८० चेंडूत शतक पूर्ण केले. त्यानंतर तो १२५ धावा काढून बाद झाला. रजत पाटीदारने ९६ चेंडूत १२५ धावांची शानदार खेळी केली. या दरम्यान त्याने २१ चौकार आणि ३ षटकार ठोकले. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी मध्य विभागाने २ विकेट गमावून ४३२ धावा केल्या होत्या.
दानिश मालेवारने विदर्भ आणि केरळ यांच्यात खेळवण्यात आलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात १५३ धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळेच विदर्भ संघाला सामन्यावर पकड मजबूत करता आली. दुसऱ्या डावात देखील त्याने ७३ धावा केल्या होत्या. त्याने सेमीफायनलमध्ये मुंबईविरुद्ध अर्धशतक आणि क्वार्टरफायनलमध्ये तामिळनाडूविरुद्ध अर्धशतक लागवले होते.
हेही वाचा : Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
कोण आहे दानिश मालेवार?
दानिश मालेवारचा जन्म ८ ऑक्टोबर २००३ रोजी नागपूर येथे झालाअ आहे. तो विदर्भाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये सक्रिय याहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नागपूर येथे आंध्र प्रदेशविरुद्ध पदार्पण केले होते. मालेवारने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दुसऱ्या डावात ६१ धावा केल्या. त्यानंतर, त्याने पुढील तीन डावांमध्ये अर्धशतक झळकावून आपली क्षमता दाखवून दिली होती. त्याने त्याच्या घरच्या मैदानावर विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर गुजरातविरुद्ध पहिले शतक ठोकले होते.
दानिश मालेवारने या हंगामात ९ सामने खेळले असून त्याने १५ डावांमध्ये ५२.२० च्या सरासरीने ७८३ धावा फटकावल्या होत्या. या दरम्यान, त्याने २ शतके आणि ६ अर्धशतके ठोकली आहेत.