आयपीएल स्पर्धेचे गारुड जगभर पसरले याहे. आयपीएल ही स्पर्धा जगातील सर्वात प्रसिद्ध लीग म्हणून नावारूपाला आली याहे. टी20 स्वरूपात खेळवण्यात येणाऱ्या या लीगची आतुरता सगळीकडे बघायाला मिळते. या वर्षी झालेल्या 18 व्या हंगामात आरसीबीने पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.अशातच पुढील यावर्षी होणाऱ्या आयपीएल 2026 च्या 19 व्या हंगामाची हालचाल सुरू झाली आहे. आता आयपीएल 2026 स्पर्धेसाथी ट्रेड विंडोचा पर्याय खुला करण्यात आला आहे. आता प्रत्येक फ्रेंचायझी आपल्या संघात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.यामध्ये विशेषकरून दोन संघ आपल्या संघात बदल करू इच्छित याहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ यांचा समावेश याहे.यामध्ये केकेआरने एक योजना आखली असल्याची चर्चा आहे. केकेआर केएल राहुलला आपल्या संघात घेण्यासाठी हालचाली करत असल्याचे बोलले जाता आहे.(फोटो-सोशल मीडिया)
Photos: KKR's new innings in the IPL 2026 arena! Moves have been initiated to bring KL Rahul into the team..
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी प्रत्येक फ्रेंचायझी मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेर. माध्यम अहवालानुसार, कोलकाता नाईट रायडर्स संघाने भारताचा स्टार खेळाडू केएल राहुलला संघात घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे. अस बोललं जात आहे की, त्याच्याकडे संघाची धुरा देखील देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
माध्यम अहवालानुसार, कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीकडून केएल राहुलसंदर्भात दिल्ली कॅपिटल्सोबत चर्चा करण्यात आली आहे. असे बोलले जात याहे की केकेआरला एका चांगल्या भरवशाच्या खेळाडूची गरज आहे.
आयपीएलच्या 18 व्या हंगामात केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीकडून 14 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. राहुलची कामगिरी बघितली तर त्याने आयपीएल 2025 मध्ये 13 सामने खेळून 539 धावा फटकावल्या होत्या.
आयपीएलच्या 18 व्या हंगामात अजिंक्य रहाणे नेतृत्वाखाली केकेआर संघाची कामगिरी खूपच सुमार राहिली आहे. त्यामुळे 19 व्या हंगामात संघ नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. असे बोलले जाता आहे की, केकेआर मागील हंगामात समाधानकारक कामगिरी न करू शकणाऱ्या खेळाडूंना निरोप देऊ शकते.
केएल राहुलला केकेआरच्या संघात सामील झाला तर तो संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडू शकतो. सोबतच तो विकेटकीपरसह संघाची धुरा देखील सांभाळू शकतो.