DC vs KKR: KKR's Sunil Narine sets a big record, equals 'this' world record..
DC vs KKR : आयपीएल २०२५ च्या ४८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी पराभव केला. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करत कोलकात्याने २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात दिल्लीच्या संघाला १९० धावापर्यंतच मजल मारता आली. या विजयासह, कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी खेळाडू आणि फिरकी गोलंदाज सुनील नारायणने एक खास कामगिरी केली आहे. सुनील नरेनने टी-२० मध्ये संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली असून इतिहास रचला.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयात सुनील नारायणने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने तीन विकेट्स घेतल्या आहेत. सुनील नरेनने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना २०८ विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात सुनील नारायणने फाफ डु प्लेसिस, ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल यांची शिकार केली.
सुनील नरेनने २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पदार्पण केले. तेव्हापासून, सुनील नरेन कोलकात्याचा एक महत्त्वाचा अंग म्हणून वावरत आहे. सुनील नरेनने १९५ सामन्यांमध्ये २०८ विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत, त्याने समित पटेलची बरोबरी साधली आहे. ज्याने नॉटिंगहॅमशायरकडून टी-२० क्रिकेटमध्ये २०८ विकेट्स मिळवल्या आहेत.
नरेनने कोलकाता नाईट रायडर्सकडून १९० आयपीएल सामन्यांमध्ये १८६ फलंदाजांना माघारी पाठवले आहे आणि नऊ चॅम्पियन्स लीग टी-२० सामन्यांमध्ये १८ फलंदाजांना बाद केले आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने ९ विकेटच्या मोबदल्यात २०४ धावा उभ्या केल्या. ज्यामध्ये अंगक्रिशने ४४, रिंकू सिंगने ३६, अजिंक्य रहाणेने २६ धावा करून महत्वाचे योगदान दिले. दिल्लीकडून अक्षर पटेलने २, विप्रज निगमने २ आणि स्टार्कने ३ विकेट काढल्या. प्रत्युत्तरात, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली संघाला फक्त १९० धावाच करता आल्या. दिल्लीकडून फाफने ६२, अक्षर पटेलने ४३ आणि विप्राज निगमने ३८ धावा केल्या. तर कोलकाताकडून सुनील नारायणने ३, वरुण चक्रवर्तीने २ विकेट घेतल्या.