फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals : सध्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पेट कमिन्सने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला कारण पावर प्लेमध्ये एक दोन नाहीतर चार विकेट्स गमावले. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभी करण्यात ते अपयशी ठरले. दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर सनरायझर्स हैदराबादने १६४ धावांचे लक्ष्य उभे केले आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांबद्दल बोलायचं झाले तर अभिषेक शर्मा फक्त एक धाव करून बाद झाला, तर ट्रॅव्हिस हेडने फक्त २२ धावा केल्या. पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावणारा ईशान किशन या सामन्यातही फेल ठरला त्याने फक्त दोन धावा केल्या तर नितेश कुमार रेड्डीच्या हातात एकही धाव लागली नाही. सनरायझर्स हैदराबादचा एकमेव फलंदाज यशस्वी ठरला तो म्हणजेच अनिकेत वर्मा. हैदराबादच्या संघासाठी अनिकेत वर्माने ४१ चेंडूंमध्ये ७४ धावा करून कमळची खेळ दाखवली.
Innings break!
Mitchell Starc produces a spell for the ages but Aniket Verma’s gritty knock propels #SRH to 1️⃣6️⃣3️⃣ 🎯
Will #DC chase this down? 💭
Updates ▶️ https://t.co/L4vEDKzthJ#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/2mzucGaWos
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
हेनरिक क्लासेनने संघासाठी १९ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या त्यानंतर अभिनव मनोहर पेट कमिन्स हर्षल पटेल हे खेळाडू एकही दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलिया गोलंदाज मिचेल स्टार्कने संघासाठी ५ विकेट्स घेतले. म्हणजेच हैदराबादच्या अर्ध्या संघाला बाहेरचा रस्ता दखवला आहे. मोहित शर्माने १ विकेट घेतला आणि कुलदीप यादवने संघासाठी ३ विकेट्सची कमाई केली.
कर्णधार अक्षर पटेलने चेंडू मिचेल स्टार्ककडे सोपवला. स्टार्कने इशानला फक्त २ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. अभिषेक आणि इशानच्या धक्क्यातून हैदराबाद अजून सावरले नव्हते तेव्हा स्टार्कने नितीश रेड्डीलाही बाद केले. नितीशला स्टार्कने खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. १२ चेंडूत २२ धावा काढल्यानंतर क्रीजवर स्थिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या हेडला स्टार्कने बाद केले तेव्हा नितीश बाद झाल्यानंतर स्कोअरबोर्डवर फक्त १२ धावा जोडल्या गेल्या. दिल्लीच्या भयानक गोलंदाजाचा चेंडू हेड बॅटच्या आतील बाजूस लागला आणि तो किपर केएल राहुलच्या हातात पडला.
दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध झाला या सामन्यात संघाने कमालीची फलंदाजी दाखवली आणि पहिला विजय मिळवला होता. हैदराबादचे आतापर्यत दोन सामने झाले आहेत यामध्ये याकडे पहिल्या सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सला पराभूत केले होते तर दुसऱ्या सामन्यात त्यांना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.