फोटो सौजन्य - पंजाब किंग्स सोशल मीडिया
Ricky Ponting’s son video : मंगळवार, १ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल २०२५ चा एक रोमांचक सामना रंगणार आहे. याआधी पंजाब किंग्सचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध झाला होता. या सामन्यांमध्ये पंजाब किंग्सच्या संघाने गुजरात टायटन्सला ११ धावांनी त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. यापूर्वी पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या गोलंदाजीवर जोरदार टीका झाली होती. पण आता पंजाब किंग्सचे कोच आणि त्यांच्या मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पॉन्टिंगच्या चेंडूंवरचे शक्तिशाली फटके त्याच्याच मुलाने मारले होते या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. पंजाब किंग्ज (PBKS) संघ लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यापूर्वी लखनौमध्ये सराव करत होता. या शिबिरादरम्यान एक मनोरंजक घटना घडली, जेव्हा रिकी पॉन्टिंगचा मुलगा फ्लेचर पॉन्टिंगने त्याच्या वडिलांची गोलंदाजी मोडून काढली. तरुण फ्लेचर पॉन्टिंगने त्याच्या वडिलांचा सामना केला तेव्हा हा दृश्य पंजाब किंग्जसाठी एक खास क्षण बनला.
ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू आणि क्रिकेट जगामधील एक दिग्गज खेळाडू असलेले रिकी पॉन्टिंग आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पाहायला मिळत आहे. लखनौमध्ये पंजाब संघाच्या सराव शिबिरादरम्यान फ्लेचरने आपली जबरदस्त फलंदाजी क्षमता दाखवून दिली. पॉन्टिंगच्या थ्रोडाऊनवर त्याने जोरदार फलंदाजी केली. फ्लेचरची स्फोटक फलंदाजी संपूर्ण कॅम्पमध्ये चर्चेचा विषय बनली. फ्लेचर पॉन्टिंग त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटच्या जगात नाव कमावण्यास उत्सुक असल्याचे दिसते. रिकी पॉईंटिंगचा मुलगा अजूनही तरुण आहे पण तो जग जिंकण्यासाठी आतापासून त्याने मेहनत सुरु केली आहे.
Ricky Ponting’s special cricket session with his son in the nets #rickypointing #ipl2025 #ytshorts #cricket #punjabkings #pbks #viralreels #sports #sportstoday pic.twitter.com/DQet30WQBk
— Sports Today (@SportsTodayofc) March 30, 2025
या खास प्रसंगी पंजाब किंग्जचा कर्णधार आणि संघातील सदस्य त्यांच्या प्रशिक्षक आणि त्यांच्या क्रिकेट कुटुंबातील या अनोख्या कार्यक्रमाचा आनंद घेत होते. आयपीएलमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक त्यांच्या कुटुंबासह प्रवास करतात. अशा परिस्थितीत, अशा गोष्टी अनेकदा सोशल मीडियावर येत राहतात. मुलांना त्यांच्या आदर्श खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी मिळते. जेव्हा ते व्यावसायिक क्रिकेटमध्ये दिसतात तेव्हा त्यांना याचा फायदा मिळतो. पंजाब किंग्जबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी पहिला सामना जिंकला आहे. श्रेयस अय्यर हा संघाचा कर्णधार आहे, जो गेल्या हंगामात केकेआरचा कर्णधार होता.