Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deepti Sharma : दीप्ती शर्माचा क्रिकेटविश्वात पुन्हा डंका! दुसऱ्यांदा पटकावला ICC Player of the Month चा मानाचा किताब

Deepti Sharma Won second icc player of the month: भारतीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून गौरविण्यात आले आहे. तिला दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 14, 2026 | 02:08 PM
Deepti Sharma Won icc player of the month

Deepti Sharma Won icc player of the month

Follow Us
Follow Us:
  • दीप्ती शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डंका
  • दुसऱ्यांदा पटकावला ICC चा मानाचा पुरस्कार
  • मार्को यानसेनही ठरला मानकरी
Deepti Sharma : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले आहे. दिप्तीने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर, ऑक्टोबर २०२६ साठीचा आयसीसी महिला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ ( ICC Player of The Month) पुरस्कार जिंकला आहे. या पुरस्काराच्या शर्यतीत बांग्लादेशची सोभना मोस्तारी आणि ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलँड यादेखील होत्या, पण दिप्तीने त्या दोघींना मागे टाकले. विशेष बाब म्हणजे, २९ वर्षीय दीप्तीने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला आहे.

IND vs NZ: कॅप्टनसीचा श्रीगणेशा गोल्डन डकने! पहिल्याच सामन्यात Shreyas Iyerची विकेट उडाली; ‘सरपंच’च्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड

दीप्ती शर्मा दुसऱ्यांदा जिंकला आयसीसी महिला ‘प्लेअर ऑफ द मंथ’

दीप्ती शर्माला ऑक्टोबर महिन्यासाठी आयसीसीची महिला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या घरच्या मालिकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला हा पुरस्कार मिळाला आहे. ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकांमध्ये तिने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली.

दीप्तीने झिम्बाब्वेविरुद्ध दोन्ही फॉरमॅटमध्ये एकूण सहा सामने खेळले. यामध्ये तिने एका शतकाच्या मदतीने १५५ धावा केल्या आणि सात विकेट्स घेतले. रायपूर येथे झालेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दीप्तीने धडाकेबाज ४९ धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

तिने टी-२० मालिकेतही दोन विकेट्स घेत भारताला झिम्बाब्वेविरुद्ध क्लीन स्वीप करण्यास मदत केली. दीप्तीने एकदिवसीय मालिकेतही हाच फॉर्म कायम ठेवत पहिल्या सामन्यात दोन विकेट्स घेतले. तिने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. तिने या सामन्यात आपले दुसरे एकदिवसीय शतक झळकावले आणि दोन विकेट्स घेतले. या ऑलराउंडर कामगिरीसाठी दीप्तीला पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी, दीप्तीने डिसेंबर २०२३ मध्ये ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकला होता.

दिप्तीने व्यक्त केला आनंद

आयसीसी ‘वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकल्यानंतर दीप्ती शर्माने आपला आनंद व्यक्त केला. ती म्हणाली की, ‘आयसीसी ‘वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकल्याचा मला खूप आनंद आहे. झिम्बाब्वेविरुद्धची मालिका संपूर्ण संघासाठी खूप चांगली होती आणि मला युवा खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान आहे.’

मार्को यान्सेननेही पहिल्यांदाच जिंकला आयसीसी पुरस्कार

पुरुषांच्या गटात, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सेनला ऑक्टोबर २०२६ साठी आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून घोषित करण्यात आले. या २६ वर्षीय खेळाडूने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे. पाकिस्तानचा अराफत मिन्हास आणि वेस्ट इंडिजचा शाई होप हे देखील या पुरस्काराच्या शर्यतीत होते, परंतु जॅनसेनने त्या दोघांवरही मात केली.

IND vs NZ: किवींचा कहर अन् टीम इंडियाची शरणागती! बॅटिंग-बॉलिंग दोन्ही फ्लॉप; ODI क्रिकेटमध्ये भारताच्या नावे नकोसा विक्रम

💡

Frequently Asked Questions

  • Que: दीप्ती शर्माला कोणता ICC पुरस्कार मिळाला ?

    Ans: दीप्ती शर्माला ऑक्टोबर २०२६ साठीचा ICC Women 'Player Of The month' पुरस्कार मिळाला आहे.

  • Que: दीप्ती शर्माने कितव्यांदा ICC Player of the Month पुरस्कार जिंकला?

    Ans: दीप्ती शर्माने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला आहे.

  • Que: दीप्ती शर्माला हा पुरस्कार कोणत्या कामगिरीसाठी मिळाला?

    Ans: झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत तिने सहा सामन्यांत एका शतकासह १५५ धावा केल्या आणि सात विकेट्स घेतल्या.

Web Title: Deepti sharma wins second icc player of the month award october 2026 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • ICC
  • Indian Women's Cricket team
  • Marco Jansen

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.