दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूचे महिलेशी गैरवर्तन, संघ व्यवस्थापनाकडून आचारसंहिता लागू
या वेळचा आयपीएल अनेक गोष्टींनी चर्चेत राहिला आहे. या आयपीएलमध्ये अनेक नवीन नियमांनुसार सामना खेळवला जात आहे. नवीन नियमावली या आयपीएल हंगामात तयार करण्यात आली आहे. एवढे सगळे असताना आता दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूकडून महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे फ्रॅंचाईझीने यावर तत्काळ कारवाई करीत संघासाठी नवीन आचारसंहितेची नियमावली तयार केली आहे. त्याचबरोबर आता फ्रॅंचाईझी अधिकाऱ्यांना विचारल्याशिवाय कोणालाही खेळाडूंना भेटता येणार नाही. तसेच, खेळाडूला एखाद्याला भेटण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडायचे असेल, तर त्याला फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात कळवावे लागेल. पाहा आणखी काय अटी फ्रॅंचाईझीने घालून दिल्या आहेत.
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ दिल्ली कॅपिटल्सने आपल्या क्रिकेटपटूंसाठी ‘आचारसंहिता’ बनवली आहे. फ्रँचायझीच्या पार्टीत एका संघाच्या खेळाडूने महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना घडल्यानंतर काही दिवसांनी फ्रँचायझीने हे पाऊल उचलले आहे.
फ्रँचायझीने घालून दिलेले नवीन नियम
आचारसंहितेनुसार, फ्रँचायझीची स्वच्छ सार्वजनिक प्रतिमा राखण्यासाठी खेळाडूंना रात्री १० वाजल्यानंतर त्यांच्या खोलीत परिचितांना आणण्याची परवानगी असणार नाही. तसेच, खेळाडूंनासुद्धा हॉटेलबाहेर कोणाला भेटायचे असेल तर फ्रँचायझी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भेटता येणार नाही.
आचारसंहितेनुसार, खेळाडूंना त्यांच्या पाहुण्यांना भेटायचे असेल, तर ती टीम हॉटेलच्या रेस्टॉरंट किंवा कॉफी शॉपमध्ये असावी. जर एखाद्या खेळाडूला एखाद्याला भेटण्यासाठी हॉटेल सोडायचे असेल, तर त्याला त्याची माहिती फ्रेंचायझीच्या अधिकाऱ्यांना द्यावी लागेल.
सोमवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या विजयानंतर खेळाडूंसोबत सामायिक केलेल्या सल्लागारातही इशारा देण्यात आला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास दंड होऊ शकतो, असे स्पष्ट लिहिले आहे. अगदी खेळाडूचा करारही रद्द केला जाऊ शकतो.
Web Title: Delhi capitals player misbehaves with woman code of conduct imposed by team management