यंदा फुटबॉल खेळातील फिफा विश्वचषक २०२२ ही स्पर्धा कतारला खेळवली जाणार आहे. फुटबॉल जगतात एक अव्वल दर्जाच्या संघापैकी एक असलेला डेन्मार्कचा फुटबॉल संघ आहे. तेव्हा या संघाची घोषणा झाली असून अनेक नव्या तसेच जुन्या खेळाडूंना संधी देण्यात आली. डेन्मार्कचा संघ आजपर्यंत फिफा विश्वचषकाच्या (Fifa World Cup) उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचू शकलेला नाही. पण यंदा संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू असल्याने संघ आपल्या पहिल्या वहिल्या विश्वचषक ट्रॉफीचे स्वप्न पूर्ण करेल अशी आशा आहे.
डेन्मार्क सध्या फिफा क्रमवारीत १० व्या स्थानावर आहे. या संघात ख्रिश्चन एरिक्सन, युसूफ पॉलसन, केस्पर श्मिएल आणि हॉसबर्ग यांच्यासह अनेक स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे यंदा संघाकडून खूप अपेक्षा आहेत. ९२ वर्षांच्या फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात डेन्मार्क पहिल्यांदा १९८६ मध्ये मैदानात उतरला होता. आतापर्यंत या संघाने ५ विश्वचषक खेळले आहेत. १९९८ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या विश्वचषकात डेन्मार्कने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
असं आहे डेन्मार्कचा संघ –