Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK महामुकाबल्यावर पावसाचे सावट! ‘इतक्या’ टक्के पावसाचा अंदाज; चाहत्यांची धाकधूक वाढली

IND vs PAK सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेच्या हवामान खात्याने या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, सामन्याच्या निकालावर पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 13, 2026 | 07:14 PM
कोलंबोमध्ये IND vs PAK महामुकाबल्यावर पावसाचे सावट! 'इतक्या' टक्के पावसाचा अंदाज (Photo Credit- X)

कोलंबोमध्ये IND vs PAK महामुकाबल्यावर पावसाचे सावट! 'इतक्या' टक्के पावसाचा अंदाज (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • IND vs PAK सामन्यावर पावसाचे सावट!
  • १५ फेब्रुवारीला श्रीलंकेत धोक्याचा इशारा
  • चाहत्यांची धाकधूक वाढली
IND vs PAK T20 World Cup Match Weather Report: २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील सर्वात बहुप्रतिक्षित सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) येत्या १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेच्या हवामान खात्याने या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, सामन्याच्या निकालावर पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सुपर-८ साठी ‘हा’ सामना निर्णायक

भारतीय संघाने आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकून दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे, पाकिस्ताननेही नेदरलँड्स आणि अमेरिकेविरुद्ध विजय मिळवून आपले आव्हान कायम ठेवले आहे. १५ फेब्रुवारीचा जो संघ जिंकेल, तो थेट ‘सुपर-८’ फेरीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’

श्रीलंकेच्या हवामान खात्याने जारी केलेल्या विशेष बुलेटिननुसार आग्नेय बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने १५ फेब्रुवारीला मुसळधार पावसाची शक्यता आहे. ‘अ‍ॅक्यूवेदर’च्या अंदाजानुसार, कोलंबोमध्ये रविवारी पावसाची शक्यता तब्बल ९३ टक्के आहे. नैसर्गिक धोका पूर्व चेतावणी केंद्राने १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता सूचना जारी करून लोकांना हवामान बदलांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

The Sri Lanka Department of Meteorology has issued a special weather bulletin warning that a low-pressure area is likely to form over the southeastern Bay of Bengal around February 15. The Natural Hazards Early Warning Centre, issuing the notice at 10.30 a.m. today, requested… pic.twitter.com/ZGzSjfYvmY — NewsWire 🇱🇰 (@NewsWireLK) February 13, 2026

IND vs PAK: पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीसाठी भारतीय संघ रवाना

सामन्याच्या वेळी काय असेल स्थिती?

भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. हवामान अहवालानुसार संध्याकाळी ६ वाजता: पावसाची शक्यता ४९ टक्के आहे, ज्यामुळे नाणेफेकीला (Toss) विलंब होऊ शकतो. संध्याकाळी ७ वाजता सामन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता कमी होऊन ती ९ टक्क्यांवर येईल, असाही एक अंदाज आहे. सामन्यादरम्यान तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जरी पावसाचा जोर सामन्याच्या वेळी कमी होणार असल्याचे दिसत असले, तरी दुपारच्या पावसाने मैदान ओले राहिल्यास खेळ सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. ढगाळ वातावरणामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने टॉसची भूमिका निर्णायक ठरेल.

टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

IND vs PAK : R Ashwin ने पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिकच्या विरूद्ध दिला भारतीय फलंदाजांना गुरूमंत्र! Video Viral

Web Title: Rain likely for ind vs pak match in colombo this much percent rainfall forecast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • cricket news
  • IND VS PAK
  • Sports News
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs PAK: पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीसाठी भारतीय संघ रवाना
1

IND vs PAK: पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीसाठी भारतीय संघ रवाना

IND vs PAK : R Ashwin ने पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिकच्या विरूद्ध दिला भारतीय फलंदाजांना गुरूमंत्र! Video Viral
2

IND vs PAK : R Ashwin ने पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिकच्या विरूद्ध दिला भारतीय फलंदाजांना गुरूमंत्र! Video Viral

T20 World Cup 2026 दरम्यान या संघाला मोठा धक्का! दुखापतग्रस्त कर्णधार स्पर्धेतून बाहेर, बदली खेळाडूची झाली घोषणा
3

T20 World Cup 2026 दरम्यान या संघाला मोठा धक्का! दुखापतग्रस्त कर्णधार स्पर्धेतून बाहेर, बदली खेळाडूची झाली घोषणा

IND vs PAK : उस्मान तारिकची बाॅलिंग अ‍ॅक्शन टीम इंडियासाठी मोठा धोका, धोनीने बदलले त्याचे आयुष्य
4

IND vs PAK : उस्मान तारिकची बाॅलिंग अ‍ॅक्शन टीम इंडियासाठी मोठा धोका, धोनीने बदलले त्याचे आयुष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.