Will pucovski : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन् खेळाडू नेहमीच चर्चेत असतात. ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिकेटप्रती खूप एकनिष्ट असल्याचे बरेच उदाहरणं आहेत. अशाच एक क्रिकेटसाठी एकनिष्ट असणारा माजी कसोटी सलामीवीर विल पुकोव्स्कीने वयाच्या २७ व्या वर्षी सर्व स्वरूपाच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या अशा अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने असा निर्णय का घेतला? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार, तज्ञांच्या पॅनेलकडून केलेल्या शिफारशीनुसार पुकोव्स्कीला व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यास भाग पाडले गेले. पुकोव्स्कीला या फलंदाजाला त्याला आशा अनेक घटनांना सामोरे जावे लागले असल्याची माहिती मिळते. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, त्यानंतर तज्ञांकडून त्याला क्रिकेटपासून लांब जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ऑस्ट्रेलियन सलामीवीराने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.
मार्च २०२४ मध्ये, शेफील्ड शील्ड सामना खेळताना पुकोव्स्कीच्या हेल्मेटवर चेंडू आदळला होता. त्यानंतर त्याला दुखापतीमुळे क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. यामुळे तो पुढील सामन्यांमधून देखील बाहेर पडला आणि त्याला २०२४ च्या इंग्रजी उन्हाळ्यासाठी लीसेस्टरशायरसोबतचा करार देखील मोडावा लागला होता. ऑस्ट्रेलियाकडून एक कसोटी खेळलेल्या पुकोव्स्कीने मंगळवारी सेन मॉर्निंग्जवर बोलताना आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
आपल्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पुकोव्स्की म्हणाला की, ‘मी पुन्हा कधीही क्रिकेट खेळणार नाही… हे वर्ष खूप अवघड होते, मला वाटते की संपूर्ण प्रवासाबद्दल सांगण्यासाठी मला काही तास नक्कीच लागतील. पण साधा संदेश असा आहे की मी पुन्हा कधीही कोणत्याही स्तरावर क्रिकेट खेळताना दिससणाऱ्य नाही. दुर्दैवाने, माझा प्रवास इथेच संपतो.’
हेही वाचा : MI vs RCB : कोहलीचा स्वॅगच निराळा! धोकादायक बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर लगावला षटकार.., पहा व्हिडिओ
मागील वर्षी, एका वैद्यकीय समितीकडून या २७ वर्षीय फलंदाजाला निवृत्तीचा सल्ला देण्यात आला होता. कोव्स्कीने ३६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, त्यात त्याने ४५.१९ च्या सरासरीने २,३५० धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याच्या सात शतकांचा समावेश आहे. २०२०-२१ हंगामात सिडनी येथे झालेल्या भारताविरुद्धच्या सामना त्याचा एकमेव सामना होता. त्याचाय या एकमेव कसोटी सामन्यात त्याने ६२ आणि १० धावा अशा धावा केल्या होत्या.