जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
MI vs RCB : काल वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. आरसीबीने एमआयला त्यांच्याच घरच्याच मैदानावर चितपट केले. मुंबई इंडियन्सला विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २२१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात मुंबई २०९ धावार्यंतच मजल मारू शकली.
या दरम्याने आरसीबीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विराट कोहलीने तडाखेबाज फलंदाजी करत एमआयच्या गोलंदाजांना जेरीस आणले. विराट कोहलीने ४२ चेंडूचा सामाना करत ६७ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले आहे. त्याने आयपीएल २०२५ चा पहिला सामना खेळणाऱ्या बूमराहला देखील जेरीस आणले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बेंगळुरूची सुरुवात फारसी चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने फिल सॉल्टला माघारी धाडले. यानंतर, विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी आरसीबीचा डाव सांभाळला. आरसीबीचा सलामीवीर फिल साल्ट बाद झाल्यानंतर विराट कोहली बेधडक कोणत्याही दबावाखाली न् येता खेळत राहीला.
WHAT A SIX BY VIRAT KOHLI AGAINST JASPRIT BUMRAH. 🤯🔥pic.twitter.com/KSpXjQsSqE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2025
हेही वाचा : English Premier League : फुलहॅमकडून लिव्हरपूलचा धुव्वा, २-३ असा केला पराभव
विराट या सामन्यात तो सुमारे २०० च्या स्ट्राईक रेटने खेळताना दिसला. या सामन्यात त्याने केवळ २९ चेंडूंचा सामना करत अर्धशतक पूर्ण केले. त्याने देवदत्त पडिक्कलसोबत दुसऱ्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी रचली. याशिवाय, विराटने मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे स्वागत षटकार मारून केले.
काल झालेल्या आरसीबी विरुद्ध एमआयच्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२५ मध्ये पुनरागमन केले. त्याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ दरम्यान दुखापत झाली होती. यानंतर त्याने खूप महिन्यानंतर कालच्या सामन्यात पुनरागमन केले. अशा परिस्थितीत त्याच्या पुनरागमनाने चाहते आनंदी दिसत होते. पण विराट कोहलीने मात्र त्याच्या चाहत्यांचा आनंद जास्त काळ टिकू दिला नाही आणि त्याने या सामन्यात बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर एक लांब षटकार खेचला. विराट कोहलीचा षटकार मारतानाचा हा व्हिडिओ सोशल तूफान मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
हेही वाचा : PBKS vs CSK :धोनीची बॅट चालणार का? पंजाब किंग्ज विरुद्ध सीएसकेची आज पहिली लढत, जाणून घ्या A टू Z माहिती
मुंबई इंडियन्स : विल जॅक, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), नमन धीर,हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल.