
ENG vs AUS, U19 WC 2026: Australia was thrashed by 27 runs in the semi-final! England makes a grand entry into the final.
ENG vs AUS, U19 WC 2026 : आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात धडक मारली. ३ फेब्रुवारी रोजी क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकात 7 गडी गमवून 277 धावा उभ्या केल्या. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 47.3 षटकात 250 धावाच करू शकला. परिणामी इंग्लंड संघाने अंतिम सामन्यात एंट्री केली. आता अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध आज खेळवण्यात येत असलेल्या हरारे येथील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजयी संघ खेळणार. दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने आहेत.
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 277 धावा केल्या. तसेच विजयासाठी 278 धावांचं ठेवलं. आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने या धावांचा पाठलाग करताना 47.3 षटकात 250 धावाच करू शकला आणि 27 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ओलिवर पीकने शतकी खेळी केली खरी परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. ओलिवर पीकने 88 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 100 धावा फटकावल्या.त्यालाआपल्या सहकाऱ्यांची साथ मिळाली नाही आणि ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरूवात चांगली झाली नाही. आघाडीचे तीनही फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. बेन डॉवकिन्स 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर जोसेफ मूर्सने 25 आणि बेन मायसने 24 धावा केल्या. संघ अडचणीत सापडलेला असताना कर्णधार आणि विकेटकीपर थॉमस रू यांनी शतक ठोकलं. त्यामुळे इंग्लंडचा डाव काही अंशी सावरण्यात यश आले. त्याने 107 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकार मारत 110 धावांची महत्वपूर्ण खेळीस साकारली. तर कॅलेब फाल्कनरने 40 धावा काढल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाजायला मैदानावर टिकाव धरता आला नाही. राल्फी अल्बर्टने 15, फरहान अहमदने 28, सॅबेस्टीन मॉर्गनने 15 आणि जेम्स मिंटोने 2 धावा केल्या.
विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार थॉमस म्हणाला की, “मला वाटतं की तिथे पोहोचायच होतं, तशीच कामगिरी आम्ही केली आहे. शेवटी आमच्या गोलंदाजांना श्रेय द्यायला हव. मला वाटतं की आम्ही आमचे सर्व बेस तयार केले आहेत. हा एक उत्तम संघ असून संपूर्ण स्पर्धेत सर्वांनीच चांगली कामगिरी केली. माला वाटतं की आम्ही आज हा आत्मविश्वास वाढवत राहिलो आणि सुदैवाने आज त्याचा चांगलाच फायदा झाला.”