Big shock for England before the Ashes series! The player who became a star against India suddenly takes a break from Test cricket
Jamie Overton takes indefinite break from red-ball cricket : अलीकडेच भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. आता इंग्लंड संघाचे संपूर्ण लक्ष्य हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नावाजलेल्या अॅशेस मालिकेकडे लागले आहे. अशातच आता इंग्लंडला अॅशेस मालिकेपूर्वी मोठा झटका बसला आहे. इंग्लंड संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनने कसोटी क्रिकेटमधून अचानक अनिश्चित काळासाठी ब्रेकची घोषणा केली आहे. ओव्हरटनने सांगितले की, वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा वर्कलोडमध्ये खूप वाढ झाली आहे. तो आता केवळ मर्यादित षटकांच्या फॉरमॅटवरच जास्त लक्ष केंद्रित करू इच्छित आहे.
ओव्हरटनच्या पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. ज्यामुळे तो फक्त दोनच कसोटी सामन्यात खेळू शकला होता. तो गेल्या महिन्यात ओव्हल येथे भारताविरुद्ध शेवटचा कसोटी क्रिकेट खेळतानया दिसला आहे. ओव्हरटनने जून २०२२ मध्ये लीड्स येथे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
हेही वाचा : Punjab flood : ‘पुराचा विध्वंस वेदनादायक..’, पंजाब पुराबाबत माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची भावुक पोस्ट
ओव्हरटनकडून इंग्लंड क्रिकेट बोर्डाला सांगण्यात आले की, “खूप विचारविनिमय केल्यानंतर, मी लाल चेंडू क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो की मी इंग्लंडसाठी ९९ प्रथम श्रेणी सामने खेळू शकलो. ज्यामध्ये दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, १२ महिन्यांच्या कॅलेंडरमधील क्रिकेटची गरज लक्षात घेता, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रत्येक स्तरावर सर्व क्रिकेट स्वरूपात पूर्णपणे समर्पित होऊन खेळणे आता शक्य होत नाही.”
ओव्हरटन पुढे म्हणाला की, “भविष्यात माझे लक्ष हे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर असणार आहे. मी शक्य तितका वेळ हा सर्वोच्च पातळीवर खेळण्यासाठी देत राहणार आहे.” ओव्हरटनची २०२२ मध्ये त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरू झाली होती. यामध्ये फक्त सहा एकदिवसीय आणि १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि फक्त २ कसोटी सामने खेळलेले आहेत.
हेही वाचा : CPL 2025 मध्ये Tim Seifert चे वादळ घोंघावले! झळकवले सर्वात जलद शतक; केला ‘हा’ पराक्रम
ओव्हरटनच्या कसोटी ब्रेकच्या निर्णयावर इंग्लंडचे क्रिकेट संचालक रॉब की यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कसोटींमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतल्यानंतर, त्याला आता अॅशेस मालिकेसाठी संघात स्थान देता येणार नाही. जर त्याने हा निर्णय घेतलाच नसता, तर तो निश्चितच इंग्लंड संघाचा सदस्य असता. जेमीची बातमी अनपेक्षित अशीच होती आणि ती पाहून दुःख झाले आहे, कारण तो नजीकच्या भविष्यात आमच्या रेड बॉल प्लॅनचा भाग बनला असता.”