पंजाब पुराबाबत युवराज सिंगची भावुक पोस्ट(फोटो-सोशल मीडिया)
Yuvraj Singh’s emotional post about Punjab floods : पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशात पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये पंजाबमधील स्थिति वाईट आहे. पावसाने हाहाकार घातला असून यामुळे अनेक लोकांना बेघर व्हावे लागले आहे. अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पंजाबमधील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. 1,018 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून पूर आणि पावसामुळे राज्यात आतापर्यंत 8 जणांचा बळी गेला आहे. या दरम्यान अनेक स्तरावर बचावआक्री सुरू आहे. अशातच भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने पंजाब पुराबाबत भावुक पोस्ट करून जीव गमावलेल्या लोकांच्या दुखात सामील असल्याचे म्हटले आहे.
पंजाब राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने पुरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांची घरे पावसात वाहून गेली आहेत तर काहींच्या घरात पुराचे पाणी गेले आहे. नद्या नाल्यांना महापूर आला आहे. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य हाती घेत 11 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या दरम्यान पंजाब पुराने झालेल्या जीवित आणि वित्त हानीवर भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगने आपल्या ‘X’ या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर एक भावुक पोस्ट केली आहे.
Waheguru 🙏🏻#PunjabFloods2025 #Punjab pic.twitter.com/SKUq3FrDX8
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) September 1, 2025
पंजाब पुराच्या विनाशकारी परिस्थितीवर बोलताना भारतीय माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने लिहिले आहे की, “पंजाब हे माझे घर आणि माझा आत्मा आहे. या पुरांचा विध्वंस पाहणे खूप वेदनादायक आहे. कुटुंबांनी प्रियजन, घरे आणि आशा गमावल्या आहेत आणि माझे हृदय त्या प्रत्येकाच्या दुःखात आहे. कृपया लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी मी जे काही करू शकतो ते करेन. एकत्रितपणे, आपण जीवन पुन्हा निर्माण करू आणि आशा परत आणू. वाहेगुरु जी मेहर करी.”
हेही वाचा : BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत पराभूत! कांस्यकावर मानावे लागले समाधान..
रावी नदीची पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गुरुदासपूर जिल्ह्यातील घोणेवाले येथील धुस्सी बंधारा फुटला आहे परिणामी पुराचे पाणी सुमारे 15 किलोमीटर दूर असलेल्या अजनाला शहरापर्यंत जाऊन पोहोचले असून यामध्ये 80 गावे पाण्याखाली गेली आहेत. अशा कठीण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंजाबचे मुख्य सचिव के.ए.पी. सिन्हा यांच्याकडून रविवारी स्वतः अमृतसर, पठाणकोट आणि कपूरथला या पूरग्रस्त भागांना भेट देण्यात आली.