फोटो सौजन्य - X
PSlL 2025 : भारतीय नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या तलावाच्या वातावरणामुळे इंडियन प्रीमियर लीग काही काळासाठी स्पर्धा स्थगित केली आहे. अशाच प्रकारे शेजारील देशांमध्ये म्हणजेच पाकिस्तान मध्ये सुरू असलेले पीएसएल स्पर्धा देखील स्थगित करण्यात आली आहे. काल म्हणजेच 9 मे रोजी असे सांगण्यात येत होते की पाकिस्तान सुपर लीग हे दुबई मध्ये खेळवले जाणार परंतु दुबईने ही स्पर्धा आयोजित करण्यात नाकारले आहे. आत्ता पीएसएल संदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात आम्ही तुम्हाला आजच्या या लेखांमध्ये सविस्तर सांगणार आहोत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी पाकिस्तान सुपर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये हल्ले केले आणि या दरम्यान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमलाही लक्ष्य करण्यात आले, त्यानंतर गुरुवारी कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी यांच्यातील सामना थांबवण्यात आला. दोन्ही देशांमधील हल्ल्यांमुळे स्पर्धेत सहभागी होणारे परदेशी खेळाडू खूपच तणावात होते. पाकिस्तान सुपर लीगमध्ये भाग घेतलेला बांगलादेशचा फिरकीपटू रिशाद हुसेनने तिथल्या परिस्थितीबद्दल खुलासा केला, जो ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
रिशाद हुसेन म्हणाले की, न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेलने त्याला सांगितले होते की तो कधीही पाकिस्तानात परतणार नाही. क्रिकबझच्या वृत्तानुसार, रिशाद म्हणाला, “सॅम बिलिंग्ज, डॅरिल मिशेल, कुसल परेरा, डेव्हिड व्हिसेई आणि टॉम करन सारखे परदेशी खेळाडू… सगळे खूप घाबरले होते. दुबईत उतरल्यावर मिशेल म्हणाला की तो पुन्हा कधीही पाकिस्तानला जाणार नाही. विशेषतः या परिस्थितीतत सगळेच खूप घाबरले होते.”
EXPERIENCE OF BILLING, MITCHELL, PERERA, WIESE, CURRAN IN PSL.
– Tom Curran started crying like a child at the airport. 🤯
– Daryl Mitchell won’t be visiting Pakistan again. (Cricbuzz). pic.twitter.com/cAS9Koy1J4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 10, 2025
तो पुढे म्हणाला: “तो टॉम करन विमानतळावर गेला पण त्याला विमानतळ बंद असल्याचे कळले. मग तो लहान मुलासारखा रडू लागला, त्याला सांभाळण्यासाठी दोन किंवा तीन लोकांची आवश्यकता होती.” रिशाद चालू हंगामात लाहोर कलंदर्सकडून खेळत होता. वेगवान गोलंदाज नाहिद राणा पेशावर झल्मीचा भाग होता. पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झालेल्या सर्व परदेशी खेळाडूंना संयुक्त अरब अमिरातीला नेण्यात आले, तेथून त्यांना त्यांच्या संबंधित देशांमध्ये कनेक्टिंग फ्लाइटने पाठवण्यात आले.