Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Cricket : बांगलादेशच्या माजी कर्णधाराला मैदानातच हार्ट अटॅक; हेलिकॉप्टरने नेले रुग्णालयात; पहा Video

सध्या मैदानातच खेळाडूंना हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याबाबत अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशातच आता बांगलादेशातून एक दुःखद बातमी समोर आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 24, 2025 | 03:26 PM
Bangladesh Cricket: Former Bangladesh captain suffers heart attack on the field; taken to hospital by helicopter; Watch Video

Bangladesh Cricket: Former Bangladesh captain suffers heart attack on the field; taken to hospital by helicopter; Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

Bangladesh cricket : सध्या मैदानातच खेळाडूंना हृदयविकाराचे झटके आल्याच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशातच अशा परिस्थितीत आता बांगलादेशातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बांगलादेशचा ३६ वर्षीय माजी कर्णधार तमीम इक्बालला मैदानावरच हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सामना खेळत असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : IPL 2025 : MI विरुद्ध सामन्यात CSK वर बॉल टेम्परिंगचे आरोप, चेन्नईवर 2 वर्षांची बंदी घालण्यात येणार?

सामना खेळत असताना तमीम इक्बालला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज ढाका प्रीमियर लीगमध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब या संघात सामना रंगला होता. तमीम इक्बाल डीपीएलमध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लबकडून खेळत होता. तेव्हाच तमिमला क्षेत्ररक्षण करताना अचानक छातीत दुखू लागल्याचे निदर्शनास आले.

क्षेत्ररक्षण करताना वाटू लागले अस्वस्थ..

मिळालेल्या माहितीनुसार, तमीम इक्बालला क्षेत्ररक्षण करत असताना अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्याला ताबोडतोब फजिलातुनेशा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, तमीम इक्बालचा वैद्यकीय अहवाल मात्र अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) डॉक्टर डॉ. देबाशिष चौधरी यांनी या घटनेला दुजोरा देण्यात आला आहे.

हेही वाचा : IPL 2025 : हरभजन सिंहला क्रिकेट चाहत्यांनी केलं ट्रोल, जोफ्रा आर्चरवर केलेल्या टिपणी पडली महागात, फिरकी गोलंदाज अडचणीत

क्रिकेट वेबसाइट क्रिकइन्फोनुसार, तमिमने ५० षटकांच्या सामन्याच्या पहिल्या डावात अस्वस्थ वाटू लागल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला तपासायला वैद्यकीय तज्ञ ताबडतोब हजर झाले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली.

🚨 Cricket Shocker!

Tamim Iqbal suffers a heart attack during a Dhaka Premier League match today. Wishing him a speedy recovery! 🙏#TamimIqbal #DPL pic.twitter.com/p6YHPu5Du8

— Cricketik 24×7 (@cricketik247) March 24, 2025

तमीम इक्बालची क्रिकेट कारकीर्द..

तमीम इक्बालने ७० कसोटी सामन्यांव्यतिरिक्त २४३ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केल्या आहे. कसोटी क्रिकेटमध्ये, तमिम इक्बालने ३८.८९ च्या सरासरीने ५१३४ धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ३६.६५ च्या सरासरीने ८३५७ धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्सकडून मुंबई इंडियन्सचा पराभव..

इंडियन पॉसिबल लीग २०२५ चा महामुकाबला काल पार पडला. यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. कालचा सामना हा चेन्नईच्या होम ग्राऊंडवर चेपॉक येथे झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिला सामना गमावला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पहिले सामन्यामध्ये मुंबईला ४ विकेट्सने पराभूत केले. यामध्ये सलामीवीर फलंदाज रचिन रवींद्र आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने कमालीचा खेळ दाखवला.

Web Title: Former bangladesh captain tamim iqbal heart attack on the field

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 03:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.