फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा शुभारंभ १९ फेब्रुवारीपासून होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. ही हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. यावेळी पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही, इतर सर्व ७ देशांचे संघ जाहीर झाले आहेत. आता चाहते टीम इंडियाच्या संघाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
भारताच्या संघाची मागील काही महिन्यांपासून खराब कामगिरीमुळे मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. भारताच्या संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफीआधी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आता माजी दिग्गज क्रिकेटर नासिर हुसैन यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या फायनलबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ८ संघ सहभागी होत आहेत. मात्र, या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नाही. टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलनुसार खेळणार आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी होणार असून तिचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे. भारताचे स्पर्धेतमध्ये तीन साखळी सामने होणार आहेत. यामध्ये पहिला सामना बांग्लादेशविरुद्ध २० फेब्रुवारी रोजी होणार आहे तर दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध २३ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे या सामन्याची चाहते प्रचंड वाट पाहत आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान शेवटचा सामना T२० विश्वचषकामध्ये झाला होता, यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला आहे. शेवटचा आणि तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध आयोजित करण्यात आला आहे हा सामना २ मार्च रोजी होणार आहे.
फायनलबाबत स्काय स्पोर्ट्सशी बोलताना इंग्लंड संघाचा माजी कर्णधार नासिर हुसैन म्हणाले की, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. याशिवाय नासिर हुसेनने ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेचा चॅम्पियन घोषित केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी २ वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने २००० साली श्रीलंकेसोबत संयुक्तपणे या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर टीम इंडियाला विजय मिळवता आलेला नाही.
“It’s a bit like gymnastics” 🤣
Nasser and Athers discuss who was the better play between the two of them 🏏 pic.twitter.com/wOa6OmaDZD
— Sky Sports Cricket (@SkyCricket) January 15, 2025
२०१७ मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर विजेतेपदाचे स्वप्न भंगले. २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, त्यानंतर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला.