
Video: Former cricketer marries his principal! Expressing his emotions, he wrote, 'My incomplete story is now complete...'
Monty Panesar’s marriage to Subrina Johal : इंग्लंडचा माजी फिरकीपटू मोंटी पनेसर हा सुब्रिना जोहलसोबत विवाह बंधनात अडकला आहे. याबद्दल मोंटी पनेसरने इंस्टाग्रामवर तेच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्याने यावेळी, त्याने लिहिले की, “माझी अपूर्ण कहाणी पूर्ण झाली आहे. शेवटचा कसोटी सामना सुरू झाला आहे. मी मुख्याध्यापकांना प्रभावित केले.” या बरोबरच, जोहलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो देखील पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आणि असेच…पुढील अध्यायात.” ४३ वर्षीय पनेसर इंग्लंडचा एक विशेषज्ञ फिरकी गोलंदाज राहिला आहे. त्यांने ५० कसोटी सामने खेळले असून आणि १६७ विकेट्स काढल्या आहेत.
२००६ ते २०१३ दरम्यान पनेसरने इंग्लंडसाठी ५० कसोटी सामने खेळले आहेत. पनेसरने अनेकदा परदेशी खेळपट्ट्यांवर लांबलचक गोलंदाजी केली आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ५० कसोटी सामन्यांमध्ये १६७ कसोटी बळी टिपले आहे. जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची क्षमता दाखवली आहे. अलिकडच्या काळात, मुलाखती आणि माध्यमांमध्ये दिसणाऱ्या कार्यक्रमांद्वारे तो क्रिकेट जगतात तो महत्वाचा आवाज म्हणून पुढे आला आहे. त्याच्या लग्नाने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्लंडकडून क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूचे पालक भारतीय आहेत.
मोंटी पनेसरची सर्वात प्रभावी कामगिरी २०१२-१३ मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर केली होती. पनेसरने तीन सामन्यांमध्ये १७ बळी घेऊन भारताला अडचणीत आनेल होते. ज्यात दोन वेळा पाच बळी घेण्याची किमया साधली होती. इंग्लंडने मालिका २-१ अशी जिंकली होती. पनेसर आता एक क्रिकेट तज्ञ म्हणून ओळखला जातो. जो खेळातील विविध विषयांवर आपले मत मांडताना दिसून येत आहे. २०२५-२६ च्या अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर त्यांनी अलीकडेच ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
सुब्रिना जोहल इंग्लंडमधील लेस्टर येथे राहत असून ऑर्चर्ड मीड अकादमीमध्ये ती प्राचार्य आहे. जोहल जिथे काम करते ती अकादमी द मीड एज्युकेशनल ट्रस्टची सदस्य आहे, ज्याचे नेतृत्व रुशी मीड अकादमी करत आहे.