Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Gambhir death threat: I Kill You… गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, ISIS काश्मीरने ईमेलद्वारे पाठवली धमकी

Gautam Gambhir death threat News: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे की, ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये फक्त तीन शब्द लिहिले होते, I...

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 24, 2025 | 11:32 AM
गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, ISIS काश्मीरने ईमेलद्वारे पाठवली धमकी (फोटो सौजन्य-X)

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, ISIS काश्मीरने ईमेलद्वारे पाठवली धमकी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Gautam Gambhir death threat News in Marathi: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गंभीरला ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली असून या ईमेलमध्ये फक्त तीन शब्द लिहिले होते, I Kill You…, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊया…

गौतम गंभीरला ईमेलद्वारे मिळालेल्या धमकीनंतर ताबडतोब पोलिसांना या ईमेलबद्दल माहिती दिली आणि अधिकृतपणे तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी ही तपास सुरु केला. सुरुवातीच्या तपासानुसार ही धमकी आयसिस काश्मीरने दिल्याची माहिती समोर आली.

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी सायबर सेल टीम ईमेल ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. हा ईमेल कोणी आणि कुठून पाठवला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राजिंदर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, गौतम गंभीरच्या कार्यालयाने माहिती दिली की गौतम गंभीरला ‘आयएसआयएस काश्मीर’ कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी त्यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याबाबत तक्रार केली. यासोबतच त्यांनी त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याची मागणीही केली आहे.

दिल्ली पोलिसांचे निवेदन

या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे एक निवेदन आले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आम्हाला एका ईमेलची माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये गौतम गंभीरला धमकी देण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. गंभीर आधीच दिल्ली पोलिसांच्या संरक्षणात आहे. त्याच्या सुरक्षेशी संबंधित विशिष्ट माहिती आम्ही सार्वजनिक करू शकत नाही.

Praying for the families of the deceased. Those responsible for this will pay. India will strike. #Pahalgam — Gautam Gambhir (@GautamGambhir) April 22, 2025

गंभीरला यापूर्वीही धमक्या मिळाल्या

धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २२ एप्रिल रोजी गौतम गंभीरला ईमेलद्वारे दोनदा धमक्या मिळाल्या, एकदा दुपारी आणि दुसरी संध्याकाळी. दोन्ही मेलमध्ये फक्त तीन शब्द लिहिले होते: ” I Kill You… “. गंभीरला अशा धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. नोव्हेंबर २०२१ मध्ये, जेव्हा ते खासदार होते, तेव्हा त्यांना असाच एक मेल आला होता.

पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला…

गौतम गंभीरने मंगळवारी ट्विटरवर (पूर्वी X) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. गंभीरने X वर लिहिले होते – जे लोक मारले गेले त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. जे याला जबाबदार आहेत, त्यांना याची किंमत चुकावावी लागेल, भारत उत्तर देईल. या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा जीव गेला. ज्यात असंख्य पर्यटक होते. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

Web Title: Gautam gambhir death threat india head coach received two e mails that said i kill you on the day of pahalgam attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

New Year 2026 Photo : भारतीय क्रिकेट जगताने दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा, पहा दिग्गजांचे खास मेसेज
1

New Year 2026 Photo : भारतीय क्रिकेट जगताने दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा, पहा दिग्गजांचे खास मेसेज

BCCI गौतम गंभीरला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवणार का? राजीव शुक्ला यांनी सोडले मौन
2

BCCI गौतम गंभीरला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवणार का? राजीव शुक्ला यांनी सोडले मौन

गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कुऱ्हाड चालणार! BCCI कडून ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव निश्चित? 
3

गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कुऱ्हाड चालणार! BCCI कडून ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव निश्चित? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.