नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी वॉर्नने जगाचा निरोप घेतला. वॉर्नच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. वॉर्नच्या अचानक जाण्याने जगभरातील क्रिकेटरसिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे. पण याच दरम्यान भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वॉर्नच्या अचानक जाण्याबद्दल असे काही बोलले आहे, ज्यामुळे तो क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आहे.
शेन वॉर्नच्या आकस्मिक जाण्याने क्रिकेट जगत प्रचंड अस्वस्थ आहे. मात्र, याचदरम्यान गावस्कर यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. वॉर्नच्या जाण्यावर एका वाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले, ‘तो नेहमीच खुलेपणाने आयुष्य जगला. चला एकत्र जेवूया की असे काहीतरी बोलला. तो नेहमी संपूर्णपणे एका राजासारखं आयुष्य जगला. कदाचित याच कारणामुळे त्याच्या हृदयाला ते सहन झाले नाही आणि तो इतक्या लवकर वारला.