Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : आशिया कपसाठी कॉमेंट्री पॅनल जाहीर! भारताच्या ‘या’ दिग्गजांची लागली वर्णी, वाचा संपूर्ण यादी 

९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आता ब्रॉडकास्टरने त्यांच्या समालोचन पॅनेल टीमची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांच्यासह इतर दिग्गजांचा समावेश आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 08, 2025 | 08:09 PM
Asia Cup 2025: Commentary panel announced for Asia Cup! These Indian legends have been roped in, read the complete list

Asia Cup 2025: Commentary panel announced for Asia Cup! These Indian legends have been roped in, read the complete list

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप २०२५ स्पर्धा ९ ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. 
  • आशिया कपसाठी ब्रॉडकास्टरने त्यांच्या समालोचन पॅनेल टीमची घोषणा केली. 
  • सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणार आहे.

Commentary panel announced for Asia Cup 2025 : आशिया कप २०२५(Asia cup 2025)या स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होत  आहे. या स्पर्धेसाठी सर्व ८ संघ सज्ज झाले आहेत.  भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. यावेळी असहोय कप टी २० स्वरूपात खेळला जाणार आहे. सर्व सामने यूएईमध्ये खेळला जाणार आहे.  भारत १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध आपला पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर १४ सप्टेंबर रोजी भारताचा सामना पाकिस्तानसोबत खेळवला जाणार आहे.  अशातच आता ब्रॉडकास्टरने त्यांच्या समालोचन पॅनेल टीमची घोषणा केली आहे. या समालोचन पॅनेलमध्ये भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग तसेच माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची वर्णी लागली आहे.

सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणार आहे. समालोचन पॅनेल टीममध्ये भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक शास्त्री, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, रॉबिन उथप्पा, बाजीद खान, वकार युनूस, वसीम अक्रम, रसेल अर्नोल्ड आणि सायमन डौल यांचा प्रसारणाच्या जागतिक फीडसाठी निवडलेल्या समालोचकांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा : ICC कडून मोहम्मद सिराजचा सन्मान! ICC Player of the Month साठी मिळाले नामांकन! ‘हे’ खेळाडूं आहेत स्पर्धेत

हिंदी समालोचनासाठी कुणाला संधी?

हिंदी समालोचनाच्या पॅनेलमध्ये भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, अजय जडेजा, माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर आणि सबा करीम  यांना स्थान दिले गेले आहे.  भरत अरुण हे तमिळ पॅनेलमध्ये डब्ल्यूव्ही रमन सारख्या माजी खेळाडूंसोबत सामील होणार आहेत. तर तेलुगू पॅनेलमध्ये वेंकटपती राजू आणि वेणुगोपाल राव ही खेळाडू असणार आहे.

सुनील गावस्कर यांनी दिली प्रतिक्रिया..

सोनी नेटवर्कचे मुख्य महसूल अधिकारी राजेश कौल यांनी सांगितले की, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आशिया कपच्या पुनरागमनासह क्रिकेट प्रसारणाची पुनर्परिभाषा करत आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या प्रकाशनावेळी गावस्कर म्हणाले की “सूर्यकुमार यादव याच्या गतिमान नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया कपच्या मंचावर पाऊल ठेवत आहे. संघाचे नेतृत्व करत असताना आपल्याला चिकाटी आणि अनुभवाचे मिश्रण दिसत असून हा वैविध्यपूर्ण, बहुमुखी आणि लढाऊ संघ भारतीय क्रिकेटच्या भविष्याचे प्रतीक आहे.”

हेही वाचा : ऑस्ट्रेलियन खेळाडू Marcus Stoinis ची नवीन इनिंग सुरू! जोडीदार सारा झारनुचसोबतच्या प्रेमाची दिली कबुली

भारतीय संघ तरुणाईचे परिपूर्ण मिश्रण सादर करतो : रवी शास्त्री

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, “सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्या नेतृत्वाखालील हा भारतीय संघ उपकर्णधार म्हणून अनुभव आणि तरुणाईचे परिपूर्ण मिश्रण असल्याचे दिसत आहे.” पुढे ते म्हणाले की, “जसप्रीत बुमराह, अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्यासारखे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करत आहेत, तर तिलक वर्मा आणि हर्षित राणा या सारखे प्रतिभावान पर्याय आहेत.”

Web Title: Commentary panel announced for asia cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 08:09 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • Ravi Shastri
  • Robin Uthappa
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! आता मोजावा लागणार पैसा; Jiohotstar वर नव्हे, ‘या’ ॲपवर दिसणार Asia Cup चा थरार
1

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! आता मोजावा लागणार पैसा; Jiohotstar वर नव्हे, ‘या’ ॲपवर दिसणार Asia Cup चा थरार

आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’
2

आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’

PAK vs AFG : आशिया कपपुर्वी अफगाणिस्तानची लाजिरवाणी कामगिरी! अंतिम सामन्यात पाकिस्तानने तोडले लचके.. 
3

PAK vs AFG : आशिया कपपुर्वी अफगाणिस्तानची लाजिरवाणी कामगिरी! अंतिम सामन्यात पाकिस्तानने तोडले लचके.. 

PAK vs IND : पाकिस्तानला Asia cup 2025 मध्ये ‘यॉर्कर किंग’ची धास्ती! बुमराहला षटकार मारण्याचे असणार मोठे आव्हान.. 
4

PAK vs IND : पाकिस्तानला Asia cup 2025 मध्ये ‘यॉर्कर किंग’ची धास्ती! बुमराहला षटकार मारण्याचे असणार मोठे आव्हान.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.