फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विनेश फोगाटची निवृत्ती : भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटच्या डिसक्वालिफिकेशमुळे भारतामध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. विनेश फोगाटला डिसक्वालिफाय केल्यामुळे तिने आज सकाळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेकांनी तिच्याबद्दल भावुक पोस्ट शेअर करत तिला सांत्वना दिली आहे. विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक मोठ्या खेळाडूंनी तिच्या परिवाराने सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये विनेश फोगाटची बहीण आणि वर्ल्ड चॅम्पियन गीता फोगाटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर भारताचा टोकियोमधील कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
विनेश फोगाटची बहीण गीता फोगाटने सोशल मीडियावर विनेश फोगाटने शेअर केलेल्या भावुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणाली की, बहीण @फोगट_विनेश तुम्ही देशासाठी जे काही केले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू. तुमची तळमळ आणि संघर्ष शतकानुशतके स्मरणात राहील. तू सर्व मुलींसाठी आदर्श आहेस. संपूर्ण कुटुंबासह अशा प्रकारे कुस्तीला अलविदा म्हणणे संपूर्ण देशासाठी अत्यंत दुःखद आहे.
बहन @Phogat_Vinesh आपने जो देश के लिए किया है उसके लिये हम सब आपके हमेशा ऋणी रहेंगे 🙏
सदियों तक आपके जज्बे और संघर्ष को याद रखा जायेगा।
आप सभी लड़कियों के आदर्श हैं
आपका इस तरह कुश्ती से अलविदा कहना पूरे परिवार के साथ -१ पूरे देश के लिए बहुत दुःखद है 😭🙏🇮🇳 https://t.co/Ei4PHN7ATp— geeta phogat (@geeta_phogat) August 8, 2024
भारताचा कुस्तीपटू आणि टोकियो कांस्य पदक विजेता बजरंग पुनियाने विनेश फोगाटच्या निवृत्तीवर म्हणाला की, विनेश, तू पराभूत नाही झालीस, तुला पराभूत केले गेले, तू आमच्यासाठी नेहमीच विजेता राहशील, तू भारताची कन्या आहेस आणि भारताची शान आहेस.
विनेश आप हारी नही हराया गया हैं, हमारे लिए सदैव आप विजेता ही रहेगी आप भारत की बेटी के साथ साथ भारत का अभिमान भी हो 🫡😭 https://t.co/oRTCPWw6tj
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) August 8, 2024