Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! विनेशला पहिला दिलासा; CAS ने घेतला मोठा निर्णय; तातडीनं सुनावणी होणार

Vinesh Phogat : विनेशला अपात्र ठरवल्यानंतर तमाम कुस्तीप्रेमींच्या डोळे पाणावले होते. अंतिमफेरी गाठल्यानंतर पुन्हा अपात्र ठरून स्पर्धेतून बाहेर जाणे हे अत्यंत दुर्दैवी होते. आता भारताची पहिलवान विनेश फोगाटला पहिला दिलासा मिळाला आहे. आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टनं विनेश फोगाटचा अर्ज स्वीकारला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 08, 2024 | 11:57 PM
Vinesh Phogat Paris Olympic Games 2024

Vinesh Phogat Paris Olympic Games 2024

Follow Us
Close
Follow Us:

Indian wrestler Vinesh Phogat : भारताची पहिलवान विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympics) 50 किलो वजनी गटात नियमापेक्षा 100 ग्रॅम वजन अधिक आढळल्यानं निलंबित करण्यात आलं. यामुळं विनेश फोगाटचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगंल. विनेश फोगाटच्या पदक विजयाच्या जल्लोष साजरा करण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रीडा प्रेमींना यामुळं मोठा धक्का बसला. विनेश फोगाटला देखील या प्रकरणामुळं मोठा धक्का बसला होता.
विनेश फोगाटला दिलासा
आता अपात्रताप्रकारावर विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात रौप्यपदक देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. विनेशला CAS म्हणजेच कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट कडून मोठा दिलासा मिळाला आहे. कुस्तीपटू विनेश फोगट हिचा अर्ज CAS ने सुनावणीसाठी स्वीकारला आहे.
महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अर्जावर उद्या सुनावणी
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. विनेशने आपल्या अपात्रतेविरुद्ध CAS कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये अपील दाखल केलं होतं. विनेशच्या याचिकेनुसार तिनं CAS कडे संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली आहे. विनेश फोगाटच्या अर्जावर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टनं सुनावणी करण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्यास सांगितली आहे. विनेश फोगाटच्या अर्जावर भारतीय वेळेनुसार उद्या दुपारी १२.३० वाजता सुनावणी होणार आहे.

पंतप्रधान मोदींनीसुद्धा पीटी उषांबरोबर केली चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्याशी चर्चा केली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटातील स्पर्धेत रौप्य पदक दिलं जावं या मागणीसाठी विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये ( Court of Arbitration for Sport) अर्ज केला होता. हा अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
विनेश फोगाट कुस्तीमधून निवृत्त
भारताची पैलवान विनेश फोगाट हिनं आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्यासोबत जे घडलं त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट करत विनेशनं निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
काय म्हणाली होती विनेश
विनेश फोगाटनं आई कुस्ती माझ्याविरुद्ध जिंकली आणि मी पराभूत झाली. तुझं स्वप्न, माझी हिम्मत सर्व तुटलंय, यामुळं माझ्यामध्ये अधिक ऊर्जा राहिली नाही. कुस्तीमधील 2001 ते 2024 च्या प्रवासाला अलविदा, तुम्हा सर्वांची ऋणी राहीन, असं विनेश फोगाटनं म्हटलं आहे. दरम्यान, विनेश फोगाटनं निवृत्ती जाहीर केली असली तरी तिची बहीण बबिता फोगाटनं ती भारतात परतल्यानंतर वडील महावीर फोगाट तिच्यासोबत चर्चा करतील, अशी माहिती दिली आहे.

Web Title: Good news for wrestling fans first relief to vinesh cas took a big decision urgent hearing will be held

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 11:57 PM

Topics:  

  • Paris Olympic 2024
  • Vinesh phogat
  • Vinesh Phogat disqualification

संबंधित बातम्या

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
1

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.