फोटो सौजन्य : IndianPremierLeague
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्याचा अहवाल : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर आज सामना पार पडला हा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात लखनऊच्या संघाने गुजरातला त्याच्या घरच्या मैदानावर 50 धावांनी पराभुत केले. या पराभवानंतर गुजरातचे गुणतालिकेमधील पहिले स्थान अडचणीमध्ये येऊ शकते. आजच्या सामन्यात लखनऊसाठी मिचेल मार्श याने शतकीय खेळी खेळली. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर सांगणार आहोत.
गुजरातच्या संघाने आजच्या सामन्या निराशाजनक कामगिरी केली आहे. गुजरातच्या संघासमोर 236 धावांचे मोठे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शन याने आजच्या सामन्यात 16 चेंडुमध्ये 21 धावा केल्या, तर शुभमन गिल याने 20 चेंडुमध्ये 35 धावा केल्या, यात त्याने 7 चौकार मारले. जोस बटलर देखील आज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. बटलरने आजच्या सामन्यात 18 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या. शेरफन रडरफर्ड याने संघासाठी आजच्या सामन्यात महत्त्वाच्या 38 धावा केल्या. त्यानंतर विल ओरौर्क याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. शाहरुख खान याने आजच्या सामन्यात गुजरात टायटन्ससाठी एकटा खेळाडू लढला. त्याने अर्धशतक ठोकले, आजच्या सामन्यात त्याला संधी मिळाली आणि 29 चेंडूमध्ये 57 धावा केल्या.
गुजरात विरुद्ध सामन्यामध्ये लखनऊचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श याने आज शतक झळकावले. त्याने आज संघासाठी 64 चेंडुमध्ये 117 धावा केल्या. तर निकलस पुरन याने देखील संघासाठी अर्धशतक झळकावले. पुरन आजच्या सामन्यात 27 चेंडुमध्ये 56 धावा केल्या यामध्ये त्याने 5 षटकार आणि 4 चौकार मारले. त्याचबरोबर लखनऊच्या कर्णधाराच्या बॅटमधून देखील 2 षटकार लागले.
Match 64. Lucknow Super Giants Won by 33 Runs https://t.co/NwAHcYJlcP #GTvLSG #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2025
लखनऊच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर विल ओरौर्क याने आजच्या सामन्यात संघाला तीन विकेट्स मिळवून दिले. त्याने साई सुदर्शन, शेरफन रुदरफर्ट आणि राहुल तेवतीया या तिघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शहबाज अहमद याने संघाला एक विकेट मिळवून दिला त्याचबरोबर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये सामील झालेला आकाश सिंग यांनी देखील संघाला एक विकेट मिळवून दिली. आयुष बडोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन विकेट्स मिळवून दिले. त्याचबरोबर आवेश खान याने संघाला दोन विकेटची कमाई करून दिली.