फोटो सौजन्य : IndianPremierLeague
मिचेल मार्शची शतकीय खेळी : लखनऊ सुपर जायंट्सचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श याने संघासाठी आयपीएल २०२५ मधील पहिले शतक ठोकले आहे. मागील सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते तर या सामन्यात त्याने त्याचे शतक पूर्ण केले आहे. आजच्या सामन्यात त्यांनी ५६ चेंडूंमध्ये १०० धावा केले आहेत. त्याने लखनऊच्या संघासाठी सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. आज फक्त मार्शनेच नाहीतर निकलस पुरण याने देखील संघासाठी आजच्या सामन्यात कमालीची खेळी खेळली.
आजच्या सामन्यांमध्ये लखनऊच्या फलंदाजांनी मैदानावर कहर करून टाकला. एकही गुजरात टायटनच्या गोलंदाजाला त्यांनी सोडलं नाही. मैदानावर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फक्त चौकार आणि षटकारांचा पाऊस झाला. या दमदार फलंदाजीने आज लखनऊ सुपर जॉईंटच्या संघाने गुजरात टायटन्समोर पहिल्या डावात फलंदाजी करून 236 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.
GT vs LSG : एक दोन वेळा नाही तर तीन वेळा तोंडावर पडला गोलंदाज! दोनदा टळला मोठा अपघात
मिचेल मार्श याने आजच्या सामन्यात एक वेळ अशी होती जेव्हा त्याला कोणताही फलंदाज बाद करू शकणार नाही असे वाटत होते पण अर्शद खान याने त्याचा विकेट घेतला. आजच्या सामन्यात मिचेल मार्श याने १८९ चा स्ट्राईक राईटने फलंदाजी केली. त्याने त्याच्या शतक 56 चेंडूंमध्ये पूर्ण गेले. आजच्या सामन्यात त्याने 63 चेंडूंमध्ये 117 धावा केल्या यामध्ये आठ षटकारांचा समावेश आहे तर दहा चौकार त्याने मारले आहेत. लखनऊच्या संघाने दुसरा विकेट एकोणिसाव्या ओव्हरमध्ये गमावला. यावेळी १८.२ ओव्हर लखनऊच्या 212 धावा होत्या.
𝙀𝙭𝙝𝙞𝙗𝙞𝙩𝙞𝙤𝙣 𝙤𝙛 𝙗𝙧𝙪𝙩𝙚 𝙛𝙤𝙧𝙘𝙚 💥
Maiden #TATAIPL 1️⃣0️⃣0️⃣ for Mitchell Marsh 👏
He continues to look unstoppable tonight 🙅♂#GTvLSG pic.twitter.com/NiYk9V0HgT
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2025
आजचे सामन्यात आणखी एक स्टार ठरला तो म्हणजे निकलस पुरण. त्याने देखील आज पहिली येताच पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि त्याने आजच्या सामन्याची सुरुवात केली. निकलस पुरण याने आजच्या सामन्यात कमालीची कामगिरी केली आहे. त्याने आजच्या सामन्यात फिनिशरची भुमिका साकारली. निकलस पुरण याने या सामन्यात संघासाठी 27 चेंडुमध्ये 56 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 षटकारांता समावेश आहे, तर 4 चौकार मारले आहेत.
मिचेल मार्श याने आता आयपीएलच्या इतिहासामध्ये नव्या यादीमध्ये त्याचं नाव नोंदवले आहे. आयपीएल याआधी सर्वांचे धावसंख्या ही 89 इतकी होती. या सामन्या त्याने तीन अंकी संख्या ओलांडली आणि शतक झळकावले आहे आणि तो आता ऑस्ट्रेलियाचा शतक झळकावणारा नववा खेळाडू ठरला आहे. याआधी डेविड वॉर्नर, शेन वॉटसन, शॉन मार्श, मार्कस स्टॉयनिस यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.