Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy Birthday KL Rahul : आयपीएलच्या ‘त्या’ ५ डावांनी जगणं बदललं! पंजाबचा सिंह, आता बनला दिल्लीच्या हृदयाचे ठोके.. 

भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज असणारा केएल राहुलने आपली एक वेगळी छाप पाडली आहे. आज  १८ एप्रिल रोजी त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आयपीएलमध्ये काही अविस्मरणीय खेळी खेळल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 18, 2025 | 10:55 AM
Happy Birthday KL Rahul: 'Those' 5 innings of IPL changed my life! The lion of Punjab, now the heartbeat of Delhi..

Happy Birthday KL Rahul: 'Those' 5 innings of IPL changed my life! The lion of Punjab, now the heartbeat of Delhi..

Follow Us
Close
Follow Us:

Happy Birthday KL Rahul : भारतीय संघाचा विश्वासार्ह फलंदाज म्हणून केएल राहुलने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज  १८ एप्रिल रोजी त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. केएल राहुलने आतापर्यंत भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये देखील अशा अनेक अविस्मरणीय खेळी खेळल्या आहेत ज्या वर्षानुवर्षे लक्षात राहतील. फलंदाजीव्यतिरिक्त, त्याने विकेटकीपिंगमध्ये देखील मोठे योगदान दिले आहे. आता तो भारतीय एकदिवसीय संघात नियमित यष्टीरक्षक म्हणून खेळत आहे.

राहुलच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायच झालं तर, केएल राहुलने पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. त्यानंतर, त्याने आयपीएलमधील काही सर्वोत्तम संघांचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश आहे. केएल राहुल सध्याच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतआहे. या हंगामातही केएल राहुल दिल्लीसाठी शानदार कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे.  तथापि, आयपीएलच्या इतिहासाच्या बाबतीत, २०२० ते २०२२ हा काळ केएल राहुलसाठी सर्वोत्तम ठरला आहे.

हेही वाचा : DC vs RR : संदीप शर्माच्या बचावासाठी नितीश राणा मैदानात, म्हणाला, सुपर ओव्हरमधील ‘तो’ निर्णय योग्यच…

आयपीएलमधील केएल राहुलच्या टॉप ५ इनिंग्ज..

यादरम्यान, केएल राहुलने आयपीएलमध्ये अनेक शानदार खेळी खेळल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. चला आयपीएलमधील केएल राहुलच्या टॉप-५ डावांबद्दल जाणून घेऊया. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकली आहेत.

 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध नाबाद १३२ धावा(२०२०)

पाच वर्षांपूर्वी, केएल राहुल आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला होता. पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करताना, त्याने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नाबाद १३२ धावा काढल्या होत्या. त्याच्या शतकाच्या जोरावर त्याने आपल्या संघाला ९७ धावांनी मोठा विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती.  त्या सामन्यात त्याने १४ चौकार आणि ७  षटकार मारले.

मुंबई इंडियन्स विरुद्ध नाबाद १०३ धावा (२०२२)

१६ एप्रिल २०२२ रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सविरुद्ध केएल राहुलने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना ६० चेंडूत १०३ धावा फटकावल्या होत्या. त्याने नऊ चौकार आणि पाच षटकार लगावले होते. त्याहकया खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला होता. तसेच त्या सामन्यात एलएसजीला १८ धावांनी विजय मिळाला होता.

मुंबई इंडियन्स विरुद्ध नाबाद १०३ धावा, (२०२२)

केएल राहुलने त्याच्या शतकानंतर फक्त आठ दिवसांतच म्हणजे २४ एप्रिल २०२२ रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध लागोपाठ दुसरे शतक झळकावले होते. तो लखनौ सुपर जायंट्ससाठी ६२ चेंडूत १०३ धावा करत नाबाद राहिला होता.

हेही वाचा :  IPL 2025: वानखेडे स्टेडियमवर ‘हिटमॅन’ चा दबदबा! Rohit Sharma, कडून IPL इतिहासातील मोठ्या विक्रमाला गवसणी

मुंबई इंडियन्स विरुद्ध नाबाद १०० धावा, (२०१९)

सहा वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध केएल राहुलने आयपीएलमध्ये आपले पहिले शतक झळकावले होते. या राहुलने ६४ चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांसह १०० धावा केल्या होत्या. परंतु हा सामना मात्र मुंबईने आपल्या खिशात टाकला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ९३ धावा (२०२५)

केएल राहुलच्या आयपीएलमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाणारी खेळी त्याने आयपीएल २०२५ च्या या हंगामात साकारली आहे.  तो आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळत आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध केएल राहुलने  शानदार कामगिरी केली. राहुलने ५३ चेंडूत ९३ धावा केल्या होत्या.

Web Title: Happy birthday kl rahul today is the birthday of kl rahul who changed his life with those 5 innings of ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • Birthday
  • IPL 2025
  • KL Rahul Captain

संबंधित बातम्या

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
1

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ
2

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ

रिंकू सिंगची संपत्ती ऐकाल तर चक्रावून जाल! श्रीमंत कोण? होणारी जोडीदार प्रिया सरोज की भारतीय क्रिकेटपटू? वाचा सविस्तर
3

रिंकू सिंगची संपत्ती ऐकाल तर चक्रावून जाल! श्रीमंत कोण? होणारी जोडीदार प्रिया सरोज की भारतीय क्रिकेटपटू? वाचा सविस्तर

IND Vs ENG : ‘तो उत्तम सलामीवीर फलंदाज, लोकांना अजून कळलेला नाही..’, इंग्लंडच्या मोईन अलीकडून केएल राहुलसाठी गौरवोद्गार..
4

IND Vs ENG : ‘तो उत्तम सलामीवीर फलंदाज, लोकांना अजून कळलेला नाही..’, इंग्लंडच्या मोईन अलीकडून केएल राहुलसाठी गौरवोद्गार..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.