फोटो सौजन्य - सोशल मीडिया
हरभजन सिंह सोशल मीडिया पोस्ट : भारताचा स्टार माजी क्रिकेट खेळाडू हरभजन सिंह नेहमीच सोशल मीडियावर टीम इंडियाच्या अनेक निर्णयांवर त्याचे मत उघडपणे मांडत असतो. आता सोशल मीडियावर आणखी एक फोटो त्याची व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनची गेल्या आठवड्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ जणांच्या संघात निवड झाली नव्हती. संघातील यष्टिरक्षक म्हणून निवडकर्त्यांनी ऋषभ पंत आणि केएल राहुलवर विश्वास व्यक्त केला. सॅमसनने वनडे फॉरमॅटमध्ये ५६ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत, पण त्यानंतरही त्याची निवड झाली नाही. मोठ्या स्पर्धेसाठी हरभजनने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल निवडकर्त्यांवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
IND vs ENG : दुसऱ्या T20 मध्ये कसे असेल हवामान, पावसामुळे चाहते मजा लुटणार का? वाचा सविस्तर
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने संजू सॅमसनकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत म्हणाला, ‘प्रामाणिकपणे, मला त्याच्याबद्दल वाईट वाटते. तो धावा करतो पण तरीही त्याला संघामधून वगळण्यात आले आहे. मला माहित आहे की संघात फक्त १५ खेळाडू निवडले जाऊ शकतात, परंतु मला वाटते की त्याची फलंदाजी या फॉरमॅटसाठी योग्य आहे. त्याची सरासरी ५५-५६ आहे, पण तरीही तो दुसरा यष्टिरक्षक म्हणून संघात नाही. जेव्हा त्याच्या निवडीचा प्रश्न येतो तेव्हा लोक विचारतात की कोणाच्या जागी? पण जागा बनवता येते.
हरभजनने केवळ सॅमसनच नव्हे तर युझवेंद्र चहलकडेही दुर्लक्ष करण्याबद्दल मत व्यक्त केले आणि निवडकर्त्यांनी त्याचा संघात समावेश करण्याचा विचार करायला हवा होता, असे म्हटले. हरभजन म्हणाला, ‘संजू संघात नाही. युझवेंद्र चहलही संघात नाही. तुम्ही चार फिरकीपटू निवडले आहेत, त्यापैकी दोन डावखुरे. आपण विविधतेसाठी लेग स्पिनर देखील समाविष्ट करू शकता. चहल उत्तम गोलंदाज आहे. मला माहित नाही की त्याने काय चूक केली की तो या संघात बसत नाही.
Robin Uthappa: “Sanju Samson is an incredible talent, a once in a decade star. Politics is at play. Kerala also has limited Intl. players. Only reason Sanju entered Indian team is based on pure talent- Unmatchable & God’s gift. He’s always been positive.”
“Baahubali” ft Sanju💪 pic.twitter.com/13UkpdtqKw
— Suhii7 (@Suhii7__) January 24, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यशस्वी जैस्वाल संघाची सलामी करताना दिसेल, असा विश्वास हरभजनला आहे. जैस्वालला प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या वनडे संघात स्थान मिळाले आहे. मात्र, ही शक्यता कमी आहे कारण शुभमन गिलला भारताचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. हरभजन म्हणाला, ‘मला वाटले होते की यशस्वी ओपन करेल, पण आता मला तसे वाटत नाही. शुभमन गिल उपकर्णधार आहे, त्यामुळे तो सलामीला दिसणार आहे. यशस्वी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार नाही, कारण विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या स्थानांवर खेळतील.