Hasan Mahmud
हसनची कारकीर्द आतापर्यंत शानदार राहिली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धही आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले होते. यापूर्वी अलोक कपाली आणि सोहाग गाझी यांनी बांग्लादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट-ट्रिक घेतली होती. दोघेही फिरकी गोलंदाज होते. आजपर्यंत कोणत्याही वेगवान गोलंदाजाने बांग्लादेशसाठी ही कामगिरी केली नव्हती. आता हसनने या यादीत आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे. (Hasan Mahmud first Bangladesh Bowler take Test hat-trick)
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने ३४६ धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानचा पहिला डाव २४० धावांवर सर्वबाद झाला. बांग्लादेशने पहिल्या डावात १०६ धावांची आघाडी घेतली. बांग्लादेशला एवढी मोठी आघाडी मिळवू देण्यात हससने महत्वाची भूमिका बजावली. त्याने २१ षटकांत ५५ धावा देऊन ५ विकेट्स घेतले. कसोटी क्रिकेटमधील हसनची ही चौथी पाच विकेट्स -फिफर कामगिरी होती. त्याने दुसऱ्या नव्या चेंडूने कहर केला. हसनने इस्मत आलम, कैस अहमद आणि झिया उर रहमान यांना बाद करून हॅट-ट्रिक घेतली. हसनव्यतिरिक्त, इबादत होसेनने बांग्लादेशसाठी चार विकेट्स घेतले. या दोघांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे बांग्लादेश विजयाच्या जवळ पोहोचला.
हसन महमूदने अफगाणिस्तानच्या पहिल्या डावाच्या ८३ व्या षटकात शानदार कामगिरी केली. त्याने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेत आपली कसोटी हॅट-ट्रिक पूर्ण केली. हसनच्या आधी अलोक कपालीने २००३ मध्ये पेशावर येथे पाकिस्तानविरुद्ध आणि सोहाग गाझी यांनी न्यूझीलंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. २००३ मध्ये बांग्लादेशसाठी कसोटी हॅट-ट्रिक घेणारे कपाली हे पहिले गोलंदाज होते. त्यानंतर २०१३ मध्ये सोहाग गाझी यांनी हा पराक्रम केला.
हसनने आता २०१३ नंतर हॅट-ट्रिक घेतली आहे. हसनने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे. त्याने १६ कसोटी सामन्यांमध्ये ४५ विकेट्स, २६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३ विकेट्स घेतले आहेत आणि २६ टी-२० सामन्यांमध्ये २८ विकेट्स घेत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. हसन बांग्लादेशसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो.






