Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey India : हॉकी इंडियाकडून सविता पूनियाला 10 लाखांचे बक्षिस, ‘हे’ आहे कारण….

Hockey India : हॉकी इंडियाकडून सविता पूनियाला दहा लाखांचे रोख बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वात जास्त सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावे झाले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 21, 2026 | 03:12 PM
Hockey India : हॉकी इंडियाकडून सविता पूनियाला 10 लाखांचे बक्षिस, 'हे' आहे कारण....

Hockey India : हॉकी इंडियाकडून सविता पूनियाला 10 लाखांचे बक्षिस, 'हे' आहे कारण....

Follow Us
Follow Us:
  • सविताकडून वंदना कटारियाचा विक्रम मोडीत
  • ‘द वॉल ऑफ इंडिया’ नावाने प्रसिद्ध 
  • भारताची  सर्वोत्तम महिला गोलकीपर
 

स्टार हॉकीपटू सविता पूनिया भारतीय महिला हॉकीच्या इतिहासात सर्वात जास्त इंटरनॅशनल सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. या अनुभवी गोलकीपरने गाठलेल्या या नव्या यशाबाबत हॉकी इंडिया (Hockey India) कडून सोमवारी तिचे कौतुक करण्यात आले, सोबतच तिच्यासाठी रोख बक्षिसाची घोषणा करण्यात आली.

या प्रसंगी हॉकी इंडियाच्या वतीने सांगण्यात आले की, जवळपास दोन दशकापासून सविताने जी चिकाटी दाखवली, ज्या शिस्तबद्धतेने ती खेळली, याचे ते फळ आहे. तिच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हॉकी इंडियाने तिच्यासाठी 10 लाखांच्या रोख पारितोषिकाची घोषणा केली आहे. सविताने भारताची माजी स्ट्रायकर वंदना कटारियाच्या 320 सीनियर इंटरनॅशनल सामने खेळण्याच्या विक्रमाला मागे सारले. जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये इंडोनेशियाविरुद्ध भारताच्या ‘बी’ गटातील सामन्यात हा विक्रम रचला.

‘द वॉल ऑफ इंडिया’

ओपन प्लेमध्ये शॉट थांबवण्याची तिच्यातील धमक, तसेच पेनल्टी शूटआउटमध्ये न घाबरता खेळण्याचा तिचा रेकॉर्ड पाहता हॉकीच्या जगतात सविताला ‘द वॉल ऑफ इंडिया’ नावाने ओळखले जाते. अशात 36 वर्षीय सविताने 2009 साली आपला पहिला इंटरनॅशनल सामना खेळला होता. सविता आपल्या या शानदार कारकिर्दीत भारतासाठी सलग मोठ्या स्पर्धा खेळत आली आहे. तिने आतापर्यंत तीन ऑलिम्पिक, दोन एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एफआयएच प्रो लीगसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांत भाग घेतला आहे.

 

अनेक वर्षे संघाचं नेतृत्त्व

एक युवा आणि प्रतिभावंत गोलकीपरच्या रुपात सुरुवात करणारी सविता वेळेनुसार भारतीय महिला हॉकी संघातील विश्वासू खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाली. तिने अनेक वर्षे भारतीय संघाचे नेतृत्त्व केले आहे. कालांतराने संघाची कमान सलीमा टेटेकडे सोपवण्यात आली, परंतु सविता आजही भारतीय संघातील बळकट स्तंभ बनून राहिली आहे.

सविता फेब्रुवारी 2025 मध्ये एफआयएच हॉकी प्रो लीगमध्ये नेदरलंडविरुद्ध आपला 300 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळली होती. ती वंदनानंतर 300 सामने खेळणारी दुसरी भारतीय महिला आणि पी.आर. श्रीजेशनंतर ही किमया करणारी दुसरी भारतीय गोलकीपर बनलेली. तिने 20 सप्टेंबर, २०२६ ला एशियन्स गेम्सच्या पहिल्या सामन्यात उज्बेकिस्तानविरुद्ध भारताच्या 19-0 अशा दमदार विजयात वंदनाच्या 320 सामन्यांच्या ऑलटाइम रेकॉर्डची बरोबरी केली होती व सोमवारी इंडोनेशियाविरुद्धचा सामना खेळत तिने हा रेकॉर्ड मोडीत काढला.

 

Web Title: Hockey india announce price to savita puniya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Hockey
  • Indian hockey team

संबंधित बातम्या

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक
1

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक

Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय
2

Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय

Asian Games 2026: भारताचा नेम अचूक! नेमबाजांनी केली ‘पदकांची बरसात’;10m Air Rifle मध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य
3

Asian Games 2026: भारताचा नेम अचूक! नेमबाजांनी केली ‘पदकांची बरसात’;10m Air Rifle मध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य

Asian Games: वय वर्ष अवघे 13, गोल्ड मेडल जिंकून बनवला ऐतिहासिक रेकॉर्ड; जगाला केलं अचंबित
4

Asian Games: वय वर्ष अवघे 13, गोल्ड मेडल जिंकून बनवला ऐतिहासिक रेकॉर्ड; जगाला केलं अचंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.