फोटो सौजन्य - X (Hockey India)
आशिया कपसाठी भारताचा हाॅकी संघ : भारताच्या क्रिकेट संघाची आशिया कपसाठी घोषणा झाली आहे, टीम इंडिया सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळणार आहे. 19 ऑगस्ट रोजी भारताचे निवडकर्ते आणि सुर्यकुमार यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये संघाची घोषणा केली होती. भारताच्या संघामध्ये 15 खेळाडूंना सामील करण्यात आले आहे. हॉकी आशिया कप स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे खेळवली जाईल. यासाठी टीम इंडियाच्या १८ सदस्यीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.
हरमनप्रीत सिंग पुन्हा एकदा भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आशिया कपसाठी भारतीय हॉकी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शिलानंद लाक्रा आणि दिलप्रीत सिंग यांनीही आपले स्थान पक्के केले आहे. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही टीम इंडियाचा भाग होते. याशिवाय गोलकीपिंगची जबाबदारी सूरज आणि पाठक यांच्यावर असेल.
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाला आशिया कप जिंकून FIH विश्वचषकाचे तिकीट मिळवायचे आहे. हा विश्वचषक २०२६ मध्ये खेळला जाईल. तो १४ ऑगस्टपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना ३० ऑगस्ट रोजी खेळला जाईल. विश्वचषकाचे सर्व सामने नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये खेळले जातील. टीम इंडियाने फक्त एकदाच विश्वचषक विजेतेपद जिंकले आहे.
𝐒𝐐𝐔𝐀𝐃 𝐋𝐎𝐂𝐊𝐄𝐃 𝐈𝐍! 🔒
Presenting our Harmanpreet Singh-led team for the upcoming Hero Asia Cup Rajgir, Bihar 2025.#HockeyIndia #IndiaKaGame #HumSeHaiHockey pic.twitter.com/Jw8BXyTC7e
— Hockey India (@TheHockeyIndia) August 20, 2025
भारतीय हॉकी संघ १९७५ मध्ये चॅम्पियन बनला होता. भारतीय हॉकी संघाने ३ वेळा आशिया कप विजेतेपद जिंकले आहे. २००३, २००७ आणि २०१७ मध्ये संघाला विजेतेपद जिंकण्यात यश आले होते. याशिवाय, भारतीय संघ ५ वेळा उपविजेता राहिला आहे. शेवटचा आशिया कप स्पर्धा जकार्ता येथे खेळवण्यात आली होती आणि टीम इंडियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
गोलरक्षक- सूरज कारकेरा, क्रिशन बी पाठक
बचावपटू- हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंग, सुमित, संजय, जुगराज सिंग
मिडफिल्ड- मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, राजिंदर, राज कुमार पाल, हार्दिक सिंग
फॉरवर्ड- मनदीप सिंग, अभिषेक, सुखजित सिंग, शिलानंद लाक्रा, दिलप्रीत सिंग
राखीव खेळाडू- नीलम संजीप सेस, सेल्वम कीर्ती
तारिख | सामना |
---|---|
29 ऑगस्ट 2025 | मलेशिया विरुद्ध बांगलादेश |
कोरिया विरुद्ध चायनीज ताईपेई | |
जपान विरुद्ध कझागिस्तान | |
इंडिया विरुद्ध चायना | |
30 ऑगस्ट 2025 | बांगलादेश विरुद्ध चायनीज ताईपेई |
कोरिया विरुद्ध मलेशिया | |
31 ऑगस्ट 2025 | चायना विरुद्ध कझागिस्तान |
जपान विरुद्ध भारत | |
1 सप्टेंबर 2025 | बांगलादेश विरुद्ध कोरिया |
मलेशिया विरुद्ध चायनीज ताईपेई | |
चायना विरुद्ध जपान | |
इंडिया विरुद्ध कझागिस्तान |
2 सप्टेंबर 2025 रोजी विश्रांतीचा दिवस असणार आहे या दिवशी कोणताही सामना खेळवला जाणार नाही त्यानंतर सेमी फायनल च्या फेरीसाठी सामने खेळवले जाणार आहेत.