फोटो सौजन्य - राज शमामी युट्युब/सोशल मीडिया
भारतीय क्रिकेट खेळाडूंना करोडोमध्ये एका सामन्याचा पगार मिळतो असे अनेक वृत्त तुम्ही वाचले असतील. क्रिकेट खेळ हा एका मोठ्या टीम शिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे मग त्यामध्ये खेळाडू, क्रिकेट चालवणाऱ्या कंपनीतील क्रिकेट मैदानावरील स्टाफ आणि क्रिकेट असो किंवा कोणताही खेळाडू असो यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा व्यक्ती म्हणजेच कॉमेंटेटर’. भारताचे अनेक क्रिकेट कॉमेंटेटर’ आहेत जे जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. यामध्ये जतीन सप्रू, आकाश चोप्रा, इरफान पठाण, रवी शास्त्री असा अनेक कॉमेंटेटरचा समावेश आहे. क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, इतर बरेच लोक देखील क्रिकेट सामन्यांमध्ये चांगले पैसे कमावतात, ज्यात कॉमेंटेटरचा देखील समावेश आहे.
कॉमेंटेटर त्यांच्या कॉमेंट्रीने सामना अधिक मनोरंजक बनवतात. कॉमेंट्री बॉक्समध्ये अनेकदा माजी क्रिकेटपटूच दिसतात. तथापि, असे काही कॉमेंटेटर आहेत जे क्रिकेट क्षेत्राशी संबंधित नाहीत, म्हणजेच ते व्यावसायिक क्रिकेट खेळलेले नाहीत. चला तर मग जाणून घेऊया एका कॉमेंटेटर एका सामन्यात किती कमाई करतात. सध्या प्रसिद्ध कॉमेंटेटर आकाश चोप्रा यांनी एका कॉमेंटेटरच्या कमाईबद्दल सांगितले. राज शामानी यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्राने आपल्या उत्कृष्ट समालोचनासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका कॉमेंटेटरच्या कमाईचा खुलासा केला. या शोमध्ये आकाश चोप्राला विचारण्यात आले की, “एक कॉमेंटेटर किती पैसे कमवू शकतो?” यावर उत्तर देताना आकाश चोप्राने सांगितले की, त्याला एका सामन्यासाठी फी मिळते, ज्यामध्ये तो दररोज 6 ते 10 लाख रुपये कमवू शकतो या संदर्भात, जर एखाद्या कॉमेंटेटरने वर्षातून 100 दिवस कॉमेंट्री केली तर त्याला वर्षभरात 10 कोटी रुपये मिळतील.
असे अनेक कॉमेंटेटर आहेत जे चाहत्यांच्या मनात घर करतात. यामधील एक ऐतिहासिक किस्सा म्हणजेच T२० विश्वचषक २०२४ मधील. २०२४ T२० वर्ल्ड कपच्या कॉमेंट्रीनेही चाहत्यांच्या मनात घर केले आहे. शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल घेतला तेव्हा जतीन सप्रूने लाँग ऑफ म्हणत केलेली कॉमेंट्री आजही चाहत्यांच्या हृदयात कोरली गेली आहे.