मुंबई : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक या दोघांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा आहेत. या दोघांनी या बातमीला अदयाप दुजोरा दिलेला नसला तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती खरी असल्याचे म्हंटले आहे. अशातच या दोघांमध्ये घटस्फोट का झाला? दोघांमध्ये दुरावा कोणत्या कारणामुळे आला? याबाबत सोशल मीडियातून उलटसुलट चर्चा सुरु आहेत. घटस्फोटाची चर्चा असताना शोएबचे पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर हिच्यासोबत अफेर असल्याचे बोलले जात होते. यावर आता शोएबची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री आयशा उमर हिने प्रतिक्रिया दिली आहे.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा या दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आल्यावर एक वर्षांपूर्वी शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमर हिच्या सोबत केलेलं बोल्ड फोटोशूट चर्चेत आले होते. या फोटोशूट दरम्यान यश आणि शोएबमधे जवळीक निर्माण झाल्याच्या बातम्या पाकिस्तानी मीडियाने प्रकाशित केल्या होत्या. यावर अभिनेत्री आयशाने म्हंटले, मागच्या वर्षी आमचे ते फोटोशुट झाले. आता ते पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावरुन लोकं काय काय बोलत आहे हे मला विषण्ण करणारे आहे. मीडियानं आमच्यातील नातं चुकीच्या पद्धतीनं दाखवलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना आम्हाला दोष देण्याची आयतीच संधी मिळाली. पाकिस्तानमध्ये आयशाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. एका मुलाखतीमध्ये आयशा म्हणाली की, एका लग्न झालेल्या व्यक्तीसोबत मी कशाला रिलेशन सुरु ठेवेल. आणि शोएब सानियाविषयी मला माहिती आहे. त्यांच्यात मला कोणत्याही प्रकारे दुरावा तयार करायचा नाही. मात्र लोकांना हे कळत नाही”.
पुढे आयशा म्हणाली, “आमचं जर खरचं अफेयर सुरु असते तर आम्ही ते सोशल मीडियावर कशाला व्हायरल केले असते, लग्न झालेल्या व्यक्तीसोबत तुम्ही जेव्हा फोटोशुट करता तेव्हा त्या व्यक्तीला नेहमीच ट्रोल केले जाते हा आतापर्यतच्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींवरुन आपल्याला दिसून येईल. मलाही माझं आयुष्य आहे. मी ते वेगळ्या पद्धतीनं प्लॅन करण्याचा विचार करते आहे. तेव्हा कोण काय बोलते याचा जास्त विचार करत नसल्याचे आयशानं म्हटले आहे”.