Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA: ‘रोहित शर्माला मी कधीच बाद करू शकलो नाही’, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज गोलंदाजाने केले मोठे विधान; ‘त्याचा एक शॉट…’

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाजने मोठे वक्तव्य केले आहे. रोहितला आपण कधीही बाद करू शकलो नाही, अशी कबुली देत रोहित नेहमीच प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकतो.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 01, 2025 | 09:45 PM
रोहित शर्माच्या फलंदाजीपुढे आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाजही निष्प्रभ! (Photo Credit- X)

रोहित शर्माच्या फलंदाजीपुढे आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाजही निष्प्रभ! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • रोहित शर्माच्या फलंदाजीपुढे आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाजही निष्प्रभ!
  • रोहितला आऊट न करू शकण्याचे कारण
  • म्हणाला, ‘त्याचा ‘तो’ शॉट पाहून मी…’.
IND vs SA ODI Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रांची (Ranchi) येथे खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीने १३५ धावांची खेळी केली, तर रोहित शर्मानेही ५७ धावा जोडल्या. या दोन्ही फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाने ३४९ धावांचा डोंगर उभा केला आणि दक्षिण आफ्रिकेला १७ धावांनी हरवले. या विजयानंतर रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) याने मोठे वक्तव्य केले आहे. रोहितला आपण कधीही बाद करू शकलो नाही, अशी कबुली देत रोहित नेहमीच प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकतो, असे स्टेन म्हणाला.

रोहित-कोहलीची महत्त्वपूर्ण भागीदारी

टीम इंडियाच्या डावात यशस्वी जैस्वाल १८ धावांवर लवकर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा फलंदाजीला आला. रोहितने ५१ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची प्रभावी खेळी केली. दुसऱ्या विकेटसाठी रोहित आणि कोहलीने १३६ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली, ज्यामुळे भारताच्या मोठ्या धावसंख्येची पायाभरणी झाली.

हे देखील वाचा: ICC Rankings: पहिल्या वनडेनंतर कशी आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे आयसीसी रँकिंग, कोणत्या स्थानावर संघ

रोहितबद्दल डेल स्टेन काय म्हणाला?

डेल स्टेनने रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक करताना अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. “रोहितने डावाच्या सुरुवातीला एक संधी दिली होती, पण कॅच सुटल्यानंतर त्याने त्याचा पूर्ण फायदा घेतला.” “त्याला कव्हर ड्राईव्ह (Cover Drive) आणि फ्लिक (Flick) खेळायला खूप आवडते. तो जेव्हा हवा असेल, तेव्हा विकेटच्या पुढे येऊन मोठा शॉट मारून गोलंदाजावर दबाव टाकतो.” “त्याच्या खेळीतील सर्वात खास शॉट तो होता, जेव्हा त्याने शॉर्ट थर्ड मॅनच्या (Short Third Man) डोक्यावरून चेंडू चार धावांकरिता गाईड केला. तो खरंच कमालचा शॉट होता.” “तो एक शानदार फलंदाज आहे आणि मला त्याला खेळताना पाहायला खूप आवडते, जरी मी त्याला कधीही बाद करू शकलो नाही.”

रोहितला आऊट न करू शकण्याचे कारण

डेल स्टेनने १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो रोहित शर्माला एकदाही बाद करू शकला नाही. रोहितने स्टेनच्या ११७ चेंडूंचा सामना केला आणि ७४ धावा केल्या.  रोहितने स्टेनच्या ४ चेंडूंवर ७ धावा केल्या. केवळ कसोटी क्रिकेटमध्ये स्टेनने रोहितला ४१ चेंडू टाकून १७ धावांच्या बदल्यात १ वेळा बाद केले आहे.

कोहली-रोहितचे पुढील लक्ष्य

सध्या ३७ वर्षांचा विराट कोहली आणि ३८ वर्षांचा रोहित शर्मा या दोन्ही दिग्गजांचे एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे २०२७ चा वनडे वर्ल्ड कप खेळणे आणि भारताला ट्रॉफी जिंकवून देणे. कोहलीने २०११ चा वर्ल्ड कप जिंकण्याचा अनुभव घेतला आहे, तर रोहित शर्माला अजूनही वनडे वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलता आलेली नाही. रोहित आणि कोहली दोघेही वर्ल्ड कप जिंकून आपल्या कारकिर्दीचा शेवट करण्याचा विचार करत आहेत.

हे देखील वाचा: Virat Kohli ने उडवली यशस्वी जयस्वालची खिल्ली! मैदानातच केली सलमान खानची डान्स स्टेप, Video Viral

Web Title: I could never dismiss rohit sharma south african veteran bowler makes a big statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs SA 2nd ODI: दुसऱ्या वनडेत ऋतुराज गायकवाडला डच्चू मिळणार? ऋषभ पंतच्या कमबॅकची शक्यता! कशी असेल संभाव्य प्लेइंग 11?
1

IND vs SA 2nd ODI: दुसऱ्या वनडेत ऋतुराज गायकवाडला डच्चू मिळणार? ऋषभ पंतच्या कमबॅकची शक्यता! कशी असेल संभाव्य प्लेइंग 11?

IND vs SA 2nd ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पुढील सामना कधी आणि कुठे? रोहित-कोहलीचा कहर पुन्हा अपेक्षित
2

IND vs SA 2nd ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पुढील सामना कधी आणि कुठे? रोहित-कोहलीचा कहर पुन्हा अपेक्षित

Virat Kohli ने उडवली यशस्वी जयस्वालची खिल्ली! मैदानातच केली सलमान खानची डान्स स्टेप, Video Viral
3

Virat Kohli ने उडवली यशस्वी जयस्वालची खिल्ली! मैदानातच केली सलमान खानची डान्स स्टेप, Video Viral

India Vs South Africa: कुलदीप यादवने रांचीमध्ये केली कमाल, शेन वॉर्नचा 23 वर्ष जुना विश्वविक्रम तोडला
4

India Vs South Africa: कुलदीप यादवने रांचीमध्ये केली कमाल, शेन वॉर्नचा 23 वर्ष जुना विश्वविक्रम तोडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.