Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virender Sehwag: ‘धोनीने टीममधून काढलं म्हणून संन्यास घेणार होतो…’ सेहवागचा धक्कादायक खुलासा

माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने एक मोठा खुलासा केला आणि महेंद्रसिंग धोनीने त्याला संघातून वगळल्यानंतर तो कसा निवृत्त होणार होता हे सांगितले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 15, 2025 | 02:53 PM
Virender Sehwag: ‘धोनीने टीममधून काढलं म्हणून संन्यास घेणार होतो…’ सेहवागचा धक्कादायक खुलासा
Follow Us
Close
Follow Us:
  • सेहवागचा धक्कादायक खुलासा
  • ‘धोनीने टीममधून काढलं म्हणून संन्यास घेणार होतो…’
  • सचिनच्या सल्ल्याने बदलले सेहवागचे मन

MS Dhoni Dropped Me Reveal Virender Sehwag: भारतीय संघाचा धडाकेबाज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) नुकताच एका मुलाखतीत आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. २००८ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेत तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) संघातून वगळल्यामुळे आपण एकदिवसीय क्रिकेटमधून (ODI) निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता, असे सेहवागने सांगितले. मात्र, सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) एका सल्ल्यामुळे त्याने हा निर्णय बदलला आणि पुढे भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली.

सचिनच्या सल्ल्याने बदलले सेहवागचे मन

‘पदमजीत सेहरावत’ यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सेहवागने हा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “२००७-०८ मध्ये आम्ही ऑस्ट्रेलियात होतो. त्या सिरीजमध्ये मी पहिले तीन सामने खेळलो, पण त्यानंतर धोनीने मला संघातून वगळले. काही काळ मला संघात स्थानच मिळाले नाही. त्यामुळे जर मी प्लेइंग इलेव्हनमध्येच नसेन, तर एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा काहीच उपयोग नाही, असे मला वाटले.”

यावर सेहवागने सचिन तेंडुलकरशी चर्चा केली. “मी सचिनकडे गेलो आणि त्याला सांगितले की, मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. तेव्हा सचिनने मला १९९९-२००० सालचा त्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, ‘मीसुद्धा अशाच परिस्थितीतून गेलो होतो. मलाही क्रिकेट सोडावे असे वाटले होते, पण ती वेळ निघून गेली. सध्या तुझी वेळ खराब आहे, ती निघून जाईल. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस. स्वतःला थोडा वेळ दे.’ त्यानंतरच्या मालिकेत मला पुन्हा संधी मिळाली आणि मी धावांचा पाऊस पाडला,” असे सेहवागने सांगितले. सचिनच्या या सल्ल्यानंतर सेहवागने २०११ चा विश्वचषक (2011 World Cup) खेळला आणि तो जिंकण्यातही मोलाची भूमिका बजावली.

IND vs PAK  : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा काय आहे विक्रम? टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचीच हवा 

सेहवागच्या अविश्वसनीय कारकिर्दीवर एक नजर

वीरेंद्र सेहवागने १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले, तर २००१ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके झळकावणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे.

कसोटी क्रिकेट: १०४ कसोटी सामन्यांमध्ये ४९.३४ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या. यात २३ शतके आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे.

एकदिवसीय क्रिकेट: २५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०४ च्या स्ट्राइक रेटने ८२७३ धावा केल्या. त्याच्या नावावर १५ शतके आणि ३८ अर्धशतके आहेत.

Asia Cup 2025 : मागील T20 मालिकेत खेळूनही या प्लेयर्सचा आशिया कपच्या संघातून होणार पत्ता कट!

२०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने एकदिवसीय सामन्यात २१९ धावांची द्विशतकी खेळीही केली होती. २०१० मध्ये, त्याला ICC Test Player of the Year पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, ज्यात त्याने १० कसोटी सामन्यांमध्ये ६ शतकांसह १२८२ धावा केल्या होत्या. त्यामुळे सेहवागचा हा खुलासा त्याच्या चाहत्यांसाठी एक नवीन माहिती घेऊन आला आहे, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीतील चढ-उतारांची कल्पना येते.

Web Title: I was going to retire because dhoni dropped me from the team sehwags shocking revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Mahendra Singh Dhoni
  • Virender Sehwag

संबंधित बातम्या

रविचंद्रन अश्विनचा CSK ला रामराम? IPL 2025 पूर्वी सोडणार संघ; फ्रँचायझीकडे व्यक्त केली ‘ही’ मागणी..
1

रविचंद्रन अश्विनचा CSK ला रामराम? IPL 2025 पूर्वी सोडणार संघ; फ्रँचायझीकडे व्यक्त केली ‘ही’ मागणी..

अरे बाप रे! कोहलीबद्दल एमएस धोनी काय बोलून गेला? पहिल्यांदाच सार्वजनिक केली ‘ती’ गोष्ट; उडाली खळबळ; पहा व्हिडीओ
2

अरे बाप रे! कोहलीबद्दल एमएस धोनी काय बोलून गेला? पहिल्यांदाच सार्वजनिक केली ‘ती’ गोष्ट; उडाली खळबळ; पहा व्हिडीओ

IND vs ENG 4th Test : ऋषभ पंत चढतोय यशाचे एक-एक इमले! कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत वीरेंद्र सेहवागशी साधली बरोबरी
3

IND vs ENG 4th Test : ऋषभ पंत चढतोय यशाचे एक-एक इमले! कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत वीरेंद्र सेहवागशी साधली बरोबरी

IND vs ENG : इंग्लंडमध्ये ऋषभ पंतची गाडी सुसाट! कॅप्टन कुल धोनीचा केला विक्रम खालसा; असे करणारा बनला पहिला भारतीय खेळाडू
4

IND vs ENG : इंग्लंडमध्ये ऋषभ पंतची गाडी सुसाट! कॅप्टन कुल धोनीचा केला विक्रम खालसा; असे करणारा बनला पहिला भारतीय खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.