Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Women’s World Cup मध्ये विजेत्यासह ‘हे’ संघही होणार मालामाल! होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव.. 

भारत आणि श्रीलंकेत आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी आयसीसी महिला विश्वचषकासाठी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून या रकमेत वाढ करण्यात आली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 01, 2025 | 03:36 PM
'This' team will also be rich along with the winner in the ICC Women's World Cup! It will rain crores of rupees..

'This' team will also be rich along with the winner in the ICC Women's World Cup! It will rain crores of rupees..

Follow Us
Close
Follow Us:

ICC Women’s World Cup 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून भारत आणि श्रीलंकेत आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी महिला विश्वचषकासाठी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. यावेळी आयसीसीकडून महिला विश्वचषक २०२५ साठीची बक्षीस रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. यासह, महिला विश्वचषकाची बक्षीस रक्कम आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या बक्षीस रकमेपेक्षा खूपच जास्त करण्यात आली आहे. २०२३ च्या विश्वचषकात एकूण बक्षीस रक्कम १० दशलक्ष डॉलर्स इतकी देण्यात आली होती.

आयसीसीने बक्षीस रक्कम वाढवताना म्हटले आहे की,  २०२५ च्या महिला विश्वचषकात एकूण बक्षीस रक्कम १३.८८ दशलक्ष डॉलर्स (अमेरिकन डॉलर्स) असणार आहे.  ही रक्कम या वर्षाच्या सुरुवातीला पहिले आयपीएल जेतेपद जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकलेल्या बक्षीस रकमेच्या दुप्पट असणार आहे. आयपीएलमध्ये विजेत्या संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. त्याच वेळी, महिला विश्वचषकातील विजेत्या संघाला ४० कोटी रुपये बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आहे.

हेही वाचा : T20 आशिया कपमध्ये कोण आहे सर्वोत्तम सरासरीचा किंग! जाणून घ्या ‘या’ 6 फलंदाजांची आकडेवारी

१३ व्या महिला क्रिकेट विश्वचषकात विजेता ठरणाऱ्या संघाला ४.४८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ३९,५४,००,२९४ रुपये इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाला देण्यात आलेल्या १.३२ दशलक्ष डॉलर्सच्या बक्षीस रकमेपेक्षा ही रक्कम २३९ टक्के जास्त करण्यात आली आहे.  तर उपविजेत्या संघाला २.२४ दशलक्ष डॉलर्स (१९,७७,११,३१४ रुपये) देण्यात येणार आहेत.  तसेच उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांना १.१२ दशलक्ष डॉलर्स (९,८८,५७,९२६ रुपये) मिळणर आहेत.

गट टप्प्यातील प्रत्येक सहभागी असणाऱ्या संघाला २५०,००० डॉलर्स (२,२०,६६,५०१ रुपये) मिळतील. तर गट टप्प्यातील प्रत्येक विजेत्याला $34,314 (रु. 30,28,794)मिळणार आहेत. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर राहिलेल्या संघांना $700,000 (रु. 6,17,86,900) देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेत सातव्या आणि आठव्या स्थानावर राहणाऱ्या संघांना $280,000 (रु. 2,47,14,765) मिळतील असे जाहीर करण्यात आले आहे.

महिला विश्वचषक हा एक मैलाचा दगड : आयसीसी अध्यक्ष जय शाह

आयसीसी अध्यक्ष जय शाह  बक्षीसाची रक्कम जाहीर केली तेव्हा म्हणाले की, “बक्षीस रकमेतील ही वाढ ‘महिला क्रिकेटच्या प्रवासात एक निर्णायक मैलाचा दगड’ ठरणार  आहे.  बक्षीस रकमेतील ही चार पट वाढ महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण असून हे दाखवून देत आहे की, आम्ही त्याच्या दीर्घकालीन विकासासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. तसेच आमचा  स्पष्ट संदेश असा देखील आहे की, जर एखाद्या महिलेने व्यावसायिकपणे क्रिकेट निवडले तर तिला पुरुषांइतकाच आदर आणि सुविधा देण्यात येतील.”

हेही वाचा : ‘त्याचा काही स्वार्थी हेतू असेल…’, ‘त्या’ व्हिडीओनंतर हरभजन सिंगने ललित मोदींवर साधला निशाणा

 

Web Title: Icc womens world cup 2025 prize money for the winning and participating teams increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 03:35 PM

Topics:  

संबंधित बातम्या

England Women Squad : हीदर नाईटचे पुनरागमन; महिला विश्वचषकासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला! या खेळाडूकडे असणार संघाची धुरा
1

England Women Squad : हीदर नाईटचे पुनरागमन; महिला विश्वचषकासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला! या खेळाडूकडे असणार संघाची धुरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.