फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड : T-२० विश्वचषकात सुरुवात झाली आहे, भारतीय महिला संघाचा पहिला सामना काल म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी पार पडला. यामध्ये भारताच्या संघाला पहिल्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडने भारतीय महिला संघाचा ५२ धावांनी पराभूत केलं आहे. न्यूझीलंडच्या संघाने पाहिले नाणेफेक जिंकून पाहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारताचा संघ सुरुवातीपासूनच डगमगला होता. भारतीय संघाच्या हाती पॉवर प्लेमध्ये एकही विकेट हाती लागली नाही. न्यूझीलंडची कर्णधार सोफी दिवाइनने कमालीची कामगिरी करत अर्धशतक झळकावले आणि भारताच्या महिला गोलंदाजांना धुतलं.
भारतीय महिला गोलंदाज बद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाने न्यूझीलंडने फक्त ४ विकेट्स घेतले. यामध्ये रेणुका ठाकूर ने दोन विकेट्स नावावर केले तर अरुधती रेड्डी आणि शोबनाने प्रत्येकी एक – एक विकेट नावावर केला आहे. भारतीय महिला संघाच्या फलंदाजी बद्दल बोलायचं झालं तर संघाने खूप निराशाजनक कामगिरी केली. भारताच्या संघाने न्यूझीलंड विरुद्ध सामन्यामध्ये पॉवर प्ले मध्ये ३ विकेट्स गमावले. यामध्ये संघाची तीनही भारताच्या महत्त्वाच्या फलंदाजांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताच्या संघाची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माचा पहिला विकेट गमावला.
New Zealand win Match 4⃣ of the #T20WorldCup.#TeamIndia will aim to bounce back in the next game.
Scorecard ▶️ https://t.co/XXH8OT5MsK#INDvNZ | #WomenInBlue pic.twitter.com/DmzOpOq87g
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2024
शेफाली संघासाठी ४ चेदुंमध्ये २ धावा केल्या आणि बाद झाली. त्यानंतर भारताची महत्त्वाची आणि अनुभवी सलामी फलंदाज स्मृती मानधनाचा विकेट्स गेला. मानधना संघासाठी फार मोठी काही कामगिरी करू शकला नाही. हरमनप्रीत कौर बाद होणारी तिसरी महिला फलंदाज होती. कॅप्टन हरमनप्रीत कौरने १४ चेंदुंमध्ये १५ धावा केल्या आणि बाद झाली. भारताचा एकही फलंदाज संघासाठी चांगली कामगिरी करू शकला नाही. भारताच्या एकाही महिला फलंदाजाने २० चा आकडा पार केला नाही.