Abhishek Sharma Hit 170 runs in 96 balls in Vijay Hazare Trophy
Syed Mushtaq Ali Trophy : भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्माने मेघालयविरुद्ध स्फोटक खेळी खेळली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने अवघ्या 28 चेंडूत शतक झळकावले. अभिषेकने 29 चेंडूत 8 चौकार आणि 11 षटकारांसह 106 धावा केल्या. पंजाबने 143 धावांचे लक्ष्य केवळ 9.3 षटकात पूर्ण केले. असा पराक्रम करणारा भारताचा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. अभिषेक हा सध्या भारतीय टी-20 संघाचा भाग आहे. भारताकडून तो सलामीवीर म्हणून काम करतो.
गुजरातच्या यष्टीरक्षक उर्विल पटेलनेसुद्धा केला विक्रम
त्रिपुराविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातचा यष्टिरक्षक फलंदाज उर्विल पटेलने २८ चेंडूत शतक झळकावून सर्व विक्रम मोडीत काढले. T20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो भारताचा फलंदाज ठरला. मात्र, आता भारताकडून टी-20 खेळणारा युवा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माचे नावही त्याच्यासोबत जोडले गेले आहे.
T20 मध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम
अभिषेकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 28 चेंडूत शतक झळकावले आहे. तो संयुक्तपणे भारतासाठी T20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. याशिवाय अभिषेक शर्मा संपूर्ण जगात T20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा उर्विल पटेलसह दुसरा खेळाडू ठरला आहे. T20 मध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम एस्टोनियाच्या साहिल चौहानच्या नावावर आहे, त्याने 27 चेंडूत शतक ठोकले.
अभिषेक शर्माची बॅट मेघालयविरुद्ध तळपली
मेघालयविरुद्ध डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या पंजाबचा कर्णधार अभिषेक शर्माने गोलंदाजांचा अक्षरश: चुराडा केला. एकूण 29 चेंडूंचा सामना करताना त्याने 365.52 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना नाबाद 106 धावा केल्या. अभिषेकने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 11 षटकार मारले. पंजाबने अवघ्या 9.3 षटकांत 143 धावांचे लक्ष्य गाठले आणि सामना 7 गडी राखून जिंकला. अभिषेक आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्वांना प्रभावित करत आहे.
मेघालयने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत त्याने 7 विकेट्सवर 142 धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार अभिषेक शर्मा आणि रमणदीप सिंगने सर्वाधिक 2-2 बळी घेतले. तर अश्विनी कुमार, हरप्रीत ब्रार आणि सोहराब धालीवाल यांनी 1-1 विकेट घेतली.
हेही वाचा : IND vs AUS: ॲडलेडची खेळपट्टीच नाही तर हवामानही भारतीय संघाविरुद्ध; डे-नाईट टेस्टमध्ये पावसाची शक्यता?
अभिषेक शर्माची कारकीर्द
24 वर्षीय अभिषेक शर्माने भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत 12 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 171 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 256 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतक झळकले आहे. याशिवाय अभिषेकने आयपीएलमध्ये 155.7 च्या स्ट्राइक रेटने 1377 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 7 अर्धशतके आहेत.