Unable to bear the pain of defeat against RCB! RR CEO reaches liquor shop directly, VIDEO VIRAL
RR vs RCB : गुरुवार(24 एप्रिल) रोजी आयपीएल २०२५ मधील ४२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला होता. या सामन्यात विराट कोहलीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर आरसीबीने राजस्थानला पराभूत केले होते. तसेच या विजयासह आरसीबीने या हंगामात त्यांच्या घरच्या चिन्नास्वामीवर मैदानावर पहिला विजय मिळवला होता. पण, या पराभवामुळे राजस्थानच्या सीईओंना मात्र मोठा धक्का बसला असल्याचे समोर आले आहे.
राजस्थानला पराभूत करत आरसीबीने पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. आरसीबीचा हा सहावा विजय ठरला आहे, परंतु राजस्थानच्या वाट्याला सातवा पराभव आला. त्यामुळे आता संघाचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग हळूहळू बंद होत चालला आहे. या दुःखामुळे राजस्थानचे सीईओ दारूच्या दुकानात जाताना दिसून आले.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राजस्थानचे सीईओ चेक लश मॅक्रम एका प्रसिद्ध दारूच्या दुकान टॉनिककडे जात असताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रकारचे मीम्स बनवले जाऊ लागले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर, आरसीबी चाहत्यांना खूपच मजा येत आहे. चाहत्यांनी असेही म्हटले आहे की आरआरचे सीईओ परभवाचे दुःख विसरण्यासाठी दारू पिण्यासाठी गेले असावे. तथापि, या व्हिडिओमध्ये ते दारूच्या दुकानात जात आहेत की इतरत्र हे मात्र स्पष्ट होत नाहीये.
राजस्थानचा या हंगामातील हा सातवा आणि लागोपाठ पाचवा पराभव ठरला आहे. २००९ नंतर राजस्थानने सलग पाच सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. संजू सॅमसन जखमी झाल्यामुळे त्याच्या जागी रियान परागने या सामन्याचे नेतृत्व केले होते.
काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी बंगळुरू आणि राजस्थान यांच्यामध्ये आयपीएलचा 42 वा सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने घरच्या मैदनावर आरआरचा दणदणीत पराभव केला. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 205 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ 194 धावाच करू शकला आणि त्यांना सीझनमधील सातवा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर जवळजवळ राजस्थानचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला बंगळुरूने 11 धावांनी पराभूत केले.