टीम पाकिस्तान(फोटो-सोशल मिडिया)
Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भारताला चांगला हादरा बसला आहे. हल्ल्यानंतर देश शोकाकुल झाला आहे. सर्व स्तरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भारताने कठोर निर्णय घेत पाकिस्तानविरोधात आघडी उघडली आहे. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताविरुद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढलेला दिसत आहे. अशातच आता एका पाकिस्तानी खेळाडूने भारताला डोळे वाटारले आहेत. ज्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूचा माज दिसून येत आहे.
वास्तविक पाहता, भारतात पाकिस्तानला नष्ट करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तर काही ठिकाणी पाकिस्तानविरुद्ध जोरदार कारवाईची मागणी देखील पुढे येत आहे. अशा वातावरणात एका पाकिस्तानी क्रिकेटरने असा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा फोटो पाकिस्तानी फिरकी गोलंदाज साजिद खानकडून पोस्ट करण्यात आला आहे. त्या फोटोमध्ये त्याचे लष्करी वडिल आहेत.
हेही वाचा : PSL 2025 : पाकिस्तान सुपर लीगला मोठा झटका! Pahalgam Terror Attack नंतर भारतातील प्रसारणावर बंदी..
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्षाची शक्यता खूप वाढली आहे. भारत सरकारकडून पाकिस्तानवर हल्ला करण्यात यावा आणि त्याला कठोर धडा शिकवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. अर्थात, अशा वेळी दोन्ही देशांचे लोक त्यांची ताकद दाखवून देण्यात मग्न झाले आहेत. पण पाकिस्तानी क्रिकेटपटू साजिद खानच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. जी भारताला एक प्रकारे इशाराच मानली जात आहे.
पाकिस्तानी कसोटी संघाकडून फिरकी गोलंदाज म्हणून खेळणाऱ्या साजिद खानने त्याच्या ‘x’ अकाउंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. यातील एक फोटो त्याचा असून दुसरा त्याच्या वडिलांचा आहे. साजिद खानने कॅप्शन लिहिले, ‘तुम्हाला फक्त आठवण करून देत आहे.’ यासोबतच साजिदने पाकिस्तानी ध्वज आणि ‘सॅल्यूट’ इमोजी देखील वापरला आहे. अचानक केलेल्या या पोस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
साजिदकडून करण्यात आलेली पोस्ट भारताला धमकीवजा इशाराच देण्याचे कृत्य मानली जात आहे. कारण साजिदचे वडील २००३ मध्ये पाकिस्तानी सैन्यात होते, ज्यांचे निधन झाले आहे. तसेच, या पोस्टची वेळ देखील संशयास्पद अशीच आहे, कारण पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्षाची शक्यता वाढत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत, यावेळी सैन्यात असलेल्या वडिलांचा फोटो पोस्ट करणे आणि नंतर असे कॅप्शन देणे याकडे सगळे शंकेने बघत आहे.