
IND A vs SA A: Indian team on track in first innings! Bowlers destroy Africa's bowlers
IND A vs SA A : भारत अ आणि दक्षिण अफ्रिका अ संघात दोन सामन्यांची औपचारिक कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघाचा दुसरा सामना जिंकून व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न असणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 255 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ 221 धावातच गारद झाला.
दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. तदक्षिण अफ्रिकेचा संघ 47.3 षटकात सर्व गडी गमवून 221 धावाच करू शकला. दक्षिण अफ्रिकेकडून एमके अकरमॅन याने 118 चेंडूत सर्वाधिक 134 धावांची खेळी केली. या शिवाय एकही फलंदाज साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला नाही.
हेही वाचा : MCA ने उचलले मोठे पाऊल! मुंबईत महिला क्रिकेट अकादमीसाठी घेतला ‘हा’ निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस यांना घातली गळ
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ आपल्या नावाने गाजवला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक बळी घेतले. त्याने 11.3 षटकात तीन फलंदाजांना माघारी पाठवले. तर मोहम्मद सिराज आणि आकाशदीपने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि हर्ष दुबेने प्रत्येकी एक विकेट काढली.
भारताने पहिल्या डावात 34 धावांची आघाडी घेतली आहे. या धावांच्या पुढे खेळताना दुसऱ्याचा दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने 3 गडी गमवून 78 धावा केल्या होत्या. भारताच्या खात्यात 112 धावा असून केएल राहुल नाबाद 26, तर नाईट वॉचमन म्हणून आलेला कुलदीप यादव मैदानावर आहेत. त्याने 4 चेंडूंचा सामना करत 0 धावा केल्या आहेत.
हेही वाचा : IPL 2026 : ‘किंग’ कोहलीमुळे RCB ला विकण्याची वेळ? ‘त्या’ अहवालाने उडवली मोठी खळबळ; नेमकं कारण काय?
दुसऱ्या डावाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताची सुरवात चांगली झाली नाही. भारताला पहिला गडी 5 धावांवरच बसला. अभिमन्यू ईश्वरनने 3 चेंडूंचा सामना केला तरी त्याला भोपळा फोडता अला नाही. त्यानंतर साई सुदर्शन मैदानात उतरला. त्याने 38 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 23 धावांची खेळी केली. तर देवदत्त पडिक्कल 42 चेंडूत 3 चौकार मारत 24 धावांवर माघारी गेला. भारताने दुसऱ्या डावात 250 धावांचा चा टप्पा पार केला तर त्यांना गाठणं दक्षिण अफ्रिका संघाला कठीण जाऊ शकते. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशीचा खेळ खूपच महत्त्वाचा असणार आहे, या दिवशी या कसोटीचा निकाल स्पष्ट होऊ शकतो.