Ind and Eng 2nd Test: India creates history in Edgbaston Test! Gill Sena defeats England by 336 runs; Akash Deep hits six
Ind and Eng 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या एजबॅस्टन येथील दुसऱ्या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभव करून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या मालिकेत १-१ बरोबरी साधली आहे. भारताने दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या दीड शतकाच्या जोरावर ४२७ धावा केल्या आणि आपला डाव घोषित केला. यासह भारताने मोठी आघाडी घेऊन इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडचा संघ सर्वबाद २७१ धावाच करू शकला. परिणामी भारताने धावांनी विजय मिळवला. भारताकडून आकाश दीपने ६ विकेट्स घेऊन भारताचा विजय सोपा केला. भारताचा हा सांघिक विजय ठरला आहे. या सामन्यात फलंदाजांसह गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.
तत्पूर्वी, भारताने दुसऱ्या डावात ४२७ धावा केल्या आहेत. यामध्ये कर्णधार शुभमन गिलने मोठे योगदान दिले आहे. त्याने दुसऱ्या डावात शतक लगावले. त्याने १६२ चेंडूत १६१ धावा केलंय आहेत. यशस्वी जयस्वाल २८, केएल राहुल ५५, करुण नायर २६, ऋषभ पंत ६५, नीतेश रेड्डी १, रविद्र जाडेजा ६९ धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर १२ धावांवर नाबाद राहिले. भारताकडून फलंदाजांनी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करून भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. इंग्लंडकडून जोश टंग आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर जो रूट आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
चौथ्या दिवशी भारताने दिलेल्या ६०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड मैदानात उतरला. परंतु, इंग्लंडची सुरवात खराब झाली. सलामीवीर जॅक क्रॉली ०, बेन डकेट २५, जो रूट ६, ऑली पोप २४, हॅरी ब्रूक २३, जेमी स्मिथ ८८, बेन स्टोक्स ३३, ख्रिस वोक्स ७, ब्रायडन कार्स ३८, जोश टंग २, शोएब बशीर १२ धावा करून नाबाद राहिला. भारताकडून आकाश दीपने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजने, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीध कृष्णा आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली आहे.
दुसऱ्या कसोटीच्या विजयात भारतीय कर्णधार शुभमन गिलचा मोठा वाटा आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात दुहेरी शतक केले. त्याने ३८७ चेंडूत २६९ धावा केल्या होत्या. तोच फॉर्म कायम ठेवत त्याने दुसऱ्या डावात देखील शानदार फलंदाजीचा नमूना पेश करून शतक झळकावले. गिलने १२९ चेंडूत आपले शतके पूर्ण केले. त्याने १६२ चेंडूचा सामना करत १६१ धावांची खेळी केली. त्याच्या या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध मोठी आघाडी मिळवली. परिणामी भारताने इंग्लंडवर धावांनी विजय साकार केला.
हेही वाचा : India and England 2nd Test : जो रूटची विकेट अन् रंगला वाद, पंचांकडून इंग्लंडची दिशाभूल?