Asia cup 2025: IND and UAE will be the matches! Who will be the favourite today? Batsman or bowler? Know the pitch report
IND vs UAE : आशिया कप २०२५ (Asia cup 2025) स्पर्धेला मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. या स्पर्धेच्या सुरवातीला अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आमनेसामने आले होते. या सामन्यात अफगणिस्तानने हाँगकाँगचा ९४ धावांनी धुव्वा उडवला. आज १० सप्टेंबर रोजी स्पर्धेतील दूसरा सामना भारत आणि यूएई या दोन संघात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यूएईला हळक्यात घेण्याची चूक करणार नाही. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी खेळपट्टी कशी असणार आहे? ती नेमकं कुणाला साथ देणार? याबबत आपण माहिती घेऊया.
हेही वाचा : Asia Cup 2025: UAE विरुद्ध कशी असणार भारताची Playing – 11, ‘हे’ सुपरस्टार जाणार टीमबाहेर?
दुबईतील या मैदानाबाबत बोलायचे झाले तर असे दिसते की, गोलंदाजांनी येथील फलंदाजांवर नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांकडून ६४ टक्के विकेट्स घेण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, उर्वरित विकेट्स फिरकी गोलंदाजांनी काढल्या आहेत. मधल्या काही षटकांमध्ये, फिरकी गोलंदाज हे फलंदाजांवर अंकुश लावण्याचे काम करत आल्याचे दिसून आले आहे. जर आपण सरासरी धावसंख्येबद्दल सांगायचे झाले तर ती १४४ धावा इतकी आहे. त्याच वेळी, येथे प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकण्याची ५९ टक्के हमी आहे. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणाऱ्या संघाकडून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.
युएई आणि भारत यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. ती म्हणजे या सामन्याला येथील हवामानाचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. हवामान अहवालानुसार, येथील आकाश पूर्णपणे स्वच्छ राहील. सामन्यादरम्यान पावसाच्या श्री बरसण्याची शक्यता कमी असणार आहे. परंतु जास्त उष्णतेमुळे खेळाडूंना त्रासाचा सामना करावा लागून शकतो. येथील तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच वेळी, आर्द्रता ६५% असेल.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित राणा आणि रिंकू सिंग.
मुहम्मद वसीम (कर्णधार), मुहम्मद जोहैब, आसिफ खान, आलिशान शराफू, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), हर्षित कौशिक, हैदर अली, मुहम्मद फारूख, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दीकी, सिमरनजीत सिंग, एथन डिसोझा, ध्रुव पराशर, मुहम्मद जवादुल्ला, आर्यनश शर्मा, सागिरुल्ला खान (विकेटकीपर), सागिर खान (विकेटकीपर).