
IND vs AFG quarterfinal
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा क्वार्टरफायनचा सामना २८ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना कोरोगी स्पोर्ट्स पार्कवर रंगणार आहे. स्थानिक वेळेनुसार सामना १.३० वाजता सुरु होईल, तर भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर, त्याआधी ९. ३० वाजता दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघांमधील टी२० आंतरराष्ट्रीय मालिका नुकतीच संपली आहे. आता, हे दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकतील.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील सर्व स्पर्धा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित होत आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना सोनी स्पोर्ट्स टीव्ही चॅनल्सवर पाहू शकता.याशिवाय, सोनी लिव्ह वेबसाइट आणि ॲपवर देखील सामना पाहता येईल.
जर तुमच्याकडे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कचे सबस्क्रिप्शन नसेल, तर तुम्ही डीडी फ्री डिशवर सामना थेट पाहू शकता. डीडी फ्री डिशवर डीडी स्पोर्ट्स चॅनलदेखील उपलब्ध आहे, ज्यावर सामन्याचे प्रसारण केले जाईल.
भारतीय संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, तिलक वर्मा, विपराज निगम, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, यश ठाकुर,अर्शदीप सिंग.
अफगाणिस्तान संघ:
दरविश रसूली (कर्णधार), मोहम्मद इशाक (विकेटकीपर), नजीबुल्लाह जादरान, करीम जनत, मोहम्मद अकरम, हसन ईसाखिल, खालिद तनीवाल, इमरान मीर, फैसल खान शिनोजादा, फरमानुल्लाह सफी, इसमत आलम, नांग्याल खरोती, अरब गुल मोमंद, फरीदून दाऊदजई, अब्दुल्ला अहमदजई.