
फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज चौथा सामना खेळवला जात आहे. हा सामना आज दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे आज जो संघ विजयी होणार आहे तो संघ मालिकेमध्ये आघाडी घेणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज गोल्ड कोस्टमधील कॅरारा ओव्हल येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघ अजिंक्य आघाडी मिळविण्याचे लक्ष्य ठेवतील, कारण तीन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे.
IND vs AUS T20 : मिचेल मार्शने नाणेफेक जिंकले पहिले करणार गोलंदाजी, वाचा दोन्ही संघाची Playing 11
ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर कोणताही संघ हा सामना जिंकला तर तो मालिका गमावणार नाही, कारण त्यानंतर फक्त एक सामना शिल्लक राहील आणि जास्तीत जास्त मालिका पुन्हा बरोबरीत संपेल. पराभूत संघ मालिका जिंकू शकणार नाही. म्हणूनच हा सामना जवळचा असेल. सर्वांचे लक्ष फॉर्मशी झुंजणाऱ्या शुभमन गिलवर असेल. भारताच्या संघाने संघामध्ये कोणताही बदल केला नाही.
Mitchell Marsh has won the toss & Australia 🇦🇺 will bowl first 🏏
It’s Skyball time in the T20I showdown! 🚀 India Playing XI: Unchanged
Australia Playing XI: Zampa, Maxwell, Phillipe and Dwarshius come in Will Surya & Co. light up the night against the Aussies?🇮🇳🔥#AUSvIND… pic.twitter.com/Wp2bXMEZC3 — Star Sports (@StarSportsIndia) November 6, 2025
मागील सामन्यामध्ये अभिषेक शर्माने फार काही चांगली कामगिरी केली नव्हती त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये त्याच्या कामगिरीवर नजर असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत, आजच्या चौथ्या सामन्यामध्ये ग्लेन मॅक्सवेल याचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे त्याचबरोबर अॅडम झांपा याला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे. मक्सवेल आणि झॅम्पा हे संघामध्ये सामील झाल्यामुळे संघ आणखी मजबूत होत आहे. त्यामुळे आज शुभमन गिलच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे, त्याने या मालिकेमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशीस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस आणि अॅडम झांपा