फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या चौथा कसोटी सामना सुरू आहे. नितेश कुमार रेड्डीला दुखापत झाल्यानंतर भारताच्या संघाने नवा खेळाडूंची एन्ट्री संघामध्ये केली आहे. पदार्पण करणारा अंशुल कंबोज याने संघाला एक विकेट मिळवून दिले आहे तर एक विकेट रवींद्र जडेजांनी मिळवून दिले आहे त्या व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजीच्या हाती एकही विकेट लागली नाही. इंग्लंडची सलामीवीर जोडी बेन डकेट आणि क्रॉली या दोघांनीही भारतीय गोलंदाजी चांगलीच धुलाई केली.
मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने होता. प्रथम गोलंदाजांनी आणि नंतर इंग्लिश फलंदाजांनी भारतीय संघावर वर्चस्व गाजवले. जखमी ऋषभ पंतला फलंदाजी करताना पाहणे हा भारतीय संघासाठी आनंदाचा क्षण होता. पायात फ्रॅक्चर असूनही पंत फलंदाजीला आला आणि त्याने अर्धशतक झळकावले. इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट शतकांपासून वंचित राहिले.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने २ विकेट गमावून २२५ धावा केल्या आहेत. भारताकडे १३३ धावांची आघाडी आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ८३ षटकांत ४ बाद २६४ होती. रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी १९ धावांवर नाबाद होते. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या षटकात आणि भारताच्या डावाच्या ८५ व्या षटकात रवींद्र जडेजा झेलबाद झाला. सलग ४ अर्धशतके झळकावणारा जडेजा फक्त २० धावा करू शकला. यानंतर ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सांभाळला आणि ४८ धावा जोडल्या. १०२ व्या षटकात बेन स्टोक्सने शार्दुलला आपल्या जाळ्यात अडकवले.
यानंतर, असे काही घडले ज्याची चाहत्यांना कल्पनाही नव्हती. पंजा फ्रॅक्चर असूनही ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला. रिटायर हर्ट होण्यापूर्वी ३७ धावा काढणाऱ्या पंतने ५४ धावांची खेळी केली. यासह तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला. त्याने माजी कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले. इतकेच नाही तर २ षटकार मारून पंतने कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली.
वॉशिंग्टनने एक सुंदर खेळी केली. त्याने ९० चेंडूंचा सामना केला आणि २७ धावा केल्या. पदार्पणाची कसोटी खेळणारा अंशुल कंबोज आपले खाते उघडू शकला नाही. जसप्रीत बुमराहने ४ धावा केल्या आणि मोहम्मद सिराज ४ धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने ५ बळी घेतले. जोफ्रा आर्चरलाही ३ यश मिळाले.
Stumps on Day 2 in Manchester! Debutant Anshul Kamboj & Ravindra Jadeja pick a wicket each in the final session ⚡️ England reach 225/2, trail by 133 runs. Scorecard ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/YGTUz2uzwK — BCCI (@BCCI) July 24, 2025
पहिल्या डावात इंग्लंडची सुरुवात खूपच वादळी झाली. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी केली. भारतीय जलद गोलंदाज विकेटसाठी उत्सुक होते. अशा परिस्थितीत फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आशेचा किरण म्हणून आला. केएल राहुलने त्याच्या चेंडूवर क्रॉलीचा एक शानदार झेल घेतला. क्रॉलीने शतक हुकले. त्याने ११३ चेंडूत ८४ धावा केल्या.
पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या कंबोजने भारताला दुसरा ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने बेन डकेटला त्याच्या जाळ्यात अडकवले. डकेटने १०० चेंडूत १३ चौकारांसह ९४ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत, जो रूट ११ धावांसह आणि ऑली पोप २० धावांसह मैदानावर उभे आहेत.