ऋषभ पंत आणि एमएस धोनी(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने सर्वबाद ३५८ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेऊन भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. दरम्यान भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने जखमी असताना देखील शानदार फलंदाजी केली आहे. त्याने पहिल्या डावात ५४ धावांची महत्वाची खेळी खेळली आहे. या अर्धशतकासह, त्याने इंग्लंडमध्ये आपला नववे अर्धशतक साजरे केले आहे. असा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. ब त्याने भारताचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीला मागे सोडले आहे.
ऋषभ पंत भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक बनण्याच्या प्रयत्नात असताना तो एमएस धोनीचे कसोटी विक्रम मोडत निघाला आहे. २७ वर्षीय ऋषभ पंतने गुरुवारी (२४ जुलै) ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्ध ७६ चेंडूत ५४ धावा काढून तो आता धोनीच्या पुढे निघून गेला आहे. महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडच्या भूमीवर १२ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने ८ अर्धशतके लगावली आहेत. १३ व्या सामन्यात पंतने धोनीला मागे टाकले आहे. दुखापत असून देखील त्याने या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. आता पंतच्या नावे इंग्लंडमध्ये एकूण ९ शतके जमा झाली आहेत.
तसेच अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये त्याचा पाचवा ५०+ स्कोअर ठरला होता, जो कोणत्याही भारतीय यष्टिरक्षकाने कसोटी सामन्यांमध्ये केलेला सर्वोच्च स्कोअर ठरला आहे. यापूर्वी, सर्वोत्तम स्कोअर चार वेळा धोनीच्या नावावर जमा होता (दोनदा, २००८-०९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध) आणि फारुख इंजिनिअर (१९७२-७३ मध्ये इंग्लंडविरुद्ध).
पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रामध्ये पंत ४८ चेंडूत ३७ धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली होती. परंतु, भारताच्या पहिल्या डावातील १०२ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शार्दुल ठाकूर बाद झाल्यानंतर, पंत पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात आला आणि त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ५४ धावांवरया असताना माघारी परतला. त्याला जोफ्रा आर्चरने आपली शिकार बनवले.
हेही वाचा : IND vs ENG 4th Test : भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर समाप्त; बेन स्टोक्सकडून विकेट्सचा पंजा..