Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 4th Test : Yashasvi Jaiswal चा नवा कारनामा! इंग्लंडविरुद्ध फाटकावल्या सर्वात जलद १ हजार धावा

भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा सालमीवर यशस्वी जैयस्वालने मोठी कामगिरी केली आहे. तो इंग्लंडविरुद्ध १००० धावा करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय खेळाडू बनला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 23, 2025 | 08:51 PM
IND vs ENG 4th Test: Yashasvi Jaiswal's new feat! Fastest to score 1000 runs against England

IND vs ENG 4th Test: Yashasvi Jaiswal's new feat! Fastest to score 1000 runs against England

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारताची सलामीवीर जोडी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी मोठी (९४धावा) भागीदारी रचली. परंतु, केएल राहुल ४६ धावा करून बाद झाला. तर यशस्वी जैयस्वाल ५८ धावा करून माघारी परतला. तत्पूर्वी या दरम्यान यशस्वी जयस्वालने एक विक्रम रचला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध १००० धावा करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय खेळाडू ठरला आहे.

यशस्वी जयस्वाल भारताचा माजी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनसह १६ डावांमध्ये हा विक्रम करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज बनला आहे. त्याच वेळी, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत. या दोघांनी देखील १५ डावांमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे.

हेही वाचा : IND vs ENG 4th Test : ख्रिस वोक्सचा तो चेंडू की तोफेचा गोळा? बॅटवर आदळताच झाले दोन तुकडे, जयस्वाल चकित; बॅटचे पहा Video

इंग्लंडविरुद्ध १००० कसोटी धावा करणारे सर्वात जलद भारतीय खेळाडू

  1. सचिन तेंडुलकर – १५ डाव
  2. राहुल द्रविड – १५ डाव
  3. मोहम्मद अझरुद्दीन – १६ डाव
  4. यशस्वी जयस्वाल – १६ डाव

दरम्यान यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्ध त्याचा ९ वा सामना खेळत आहे. या दरम्यान, त्याने १६ व्या डावात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये १००० धावा करण्याच्या यादीत सामील होण्यासाठी जयस्वालला चौथ्या कसोटीत ५५ धावांची गरज होती. त्याने भारताच्या पहिल्या डावाच्या ३६ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर क्रिस वोक्सच्या चेंडूवर चौकार मारून हा टप्पा पार केला. इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये किमान १००० धावा करणारा जयस्वाल हा २० वा भारतीय फलंदाज ठरला आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा आहे. सचिनने २४ वर्षांच्या कारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध ३२ कसोटी खेळल्या आणि एकूण २५३५ धावा फटकावल्या आहेत. त्याच्यानंतर सुनील गावस्करचा क्रमांक लागतो, ज्यांनी इंग्लंडविरुद्ध ३८ कसोटी सामन्यांमध्ये २४८३ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) १००० धावा करणारा जयस्वाल सहावा फलंदाजही ठरला आहे.

हेही वाचा : IND vs ENG : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला ‘असा’ योगायोग; तब्बल ९३ वर्षे आणि ५९२ सामन्यांनंतर..

सामन्याची स्थिती

दरम्यान, भारताने टी ब्रेकनंतर 3 विकेट्स गमावून १५९ धावा केल्या आहेत.तत्पूर्वी यशस्वी जैस्वाल १०७ चेंडूत ५८ धावा काढून बाद झाला. त्याला लियाम डॉसनने बाद केले. त्याआधी केएल राहुल ४६ धावा करून माघारी गेला होता. त्याला क्रिस वोक्सने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यांनतर भारतीय कर्णधार शुभमन गिल १२ धावा करून झटपट आउट झाला. त्याला बेन स्टोक्सने बाद केले. आता मैदानावर साई सुदर्शन २४ आणि रिषभ पंत १ धावांवर खेळत आहे.

 

Web Title: Ind vs eng 4th test yashasvi jaiswals record of fastest 1000 runs against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 08:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.