यशस्वी जैस्वाल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील ३ सामने खेळवण्यात आले आहेत. या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये खेळला जात आहे. कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारताने या सामन्यात सावध फलंदाजीला सुरुवात केली होती. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. नंतर केएल राहुल ४६ धाव करून बाद झाला. तर यशस्वी जैयस्वाल ५८ धावा करून माघारी परतला. तत्पूर्वी या सामन्यात एक विचित्र प्रकार घडल्याचे दिसून आले.
मँचेस्टरच्या या सामन्यात यशस्वी जयस्वाल नेहमीपेक्षा सावध खेळताना दिसून आला. या दरम्यान 9व्या षटकात एक आश्चर्यकारक असा प्रकार घडला. या सर्व प्रकारचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कारण यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटचे दोन तुकडे झाले आहेत. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर हा प्रकार घडला आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने टाकलेल्या चेंडूने खेळपट्टीवर चांगलीच उसळी घेतली. यानंतर हा चेंडू जाऊन थेट जयस्वालच्या बॅटच्या हँडलवर जाऊन आदळलाय. त्यामुळे बॅटचं हँडल तुटले. बॅट तुटल्याचं पाहून यशस्वी जयस्वाल काही क्षण बॅटकडे केवळ पाहतच राहिला. मैदानात उपस्थित खेळाडू, पंच आणि चाहते देखील हा प्राकार बघून आश्चर्यचकीत झाले होते. जयस्वालकडून बॅटची स्थिती पाहण्यात आली आणि त्याने बॅट बदलण्यासाठी डगआउटकडे इशारा केला. यानंतर करुण नायर ताबोडतोब मैदानात धाव घेत चार बॅट घेऊन आला. यापैकी एक बॅट जयस्वालने निवडली. ही घटना आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
Bat be like “mujhe kyun toda?” 😭🏏#ENGvIND 👉 4th TEST, DAY 1 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/0VxBWU8ocO pic.twitter.com/q80vIuwqIj
— Star Sports (@StarSportsIndia) July 23, 2025
मिडिया रिपोर्टनुसार, यशस्वी जयस्वालच्या तुटलेल्या बॅटची किंमत ही 1 लाख रुपये इतकी आहे. बॅटची किंमत ऐकून क्रीडाप्रेमी आणि नेटकरी यांच्याकडून प्रतिक्रिया नोंदवण्यात येत आहेत. यामध्ये काही जणांकडून ख्रिस वोक्सची स्तुती करण्यात आली. तर काही जण यशस्वी जयस्वालच्या बचावात्मक शॉट्सचे कौतुक करताना दिसत आहेत. एक चाहत्याने लिहिलं आहे की, “जयस्वालची बॅट तर तुटली, पण उत्साह मात्र कायम आहे.”
दरम्यान, भारताच्या 3 विकेट्स गमावून १४८ धावा झाल्या आहेत. यशस्वी जैस्वाल १०७ चेंडूत ५८ धावा काढून बाद झाला. त्याला लियाम डॉसनने बाद केले. त्याआधी केएल राहुल ४६ धावा करून माघारी गेला होता. त्याला क्रिस वोक्सने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यांनतर भारतीय कर्णधार शुभमन गिल १२ धावा करून झटपट आऊट झाला. त्याला बेन स्टोक्सने बाद केले. आता ५० ओव्हरचा खेळ झाला असुन मैदानावर साई सुदर्शन २४ आणि रिषभ पंत १ धावांवर खेळत आहे.